शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

नांदगाव खंडेश्वर तालुका ग्रामपंचायत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:14 IST

मंगरूळ चवाळामध्ये काँग्रेस सेना पॅनल नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा या ११ सदस्यीय मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस व सेना ...

मंगरूळ चवाळामध्ये काँग्रेस सेना पॅनल

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा या ११ सदस्यीय मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस व सेना युतीच्या पॅनलने तब्बल १० जागा पटकाविल्या. येथे महाआघाडीला निर्भेळ यश मिळाले. यात काँग्रेस व शिवसेनेच्या नेतृत्वातील पॅनलला प्रत्येकी पाच जागा मिळाल्या. भाजपप्रणीत पॅनलला मात्र एकाच जागेवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत निखिल देशमुख, लक्ष्मी खांडेकर, नीलेश निंबरते, अश्विनी चवाळे, अतुल ठाकुर, शोभा चवाळे, रेश्मा शिरभाते, रामदास कोचडे, राजेश पारधी, सविता झोपटे व सुनिता टेवरे हे उमेदवार विजयी झाले. या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे बाळासाहेब राणे, विनोद पिंपळकर, नंदकिशोर राणे, तसेच काँग्रेसचे मोरेश्वर शिरभाते, अतुल ठाकुर अ.सलामभाई व गजानन काकडे यांच्या मार्गदर्शनात या पॅनलने विजय संपादन केला.

----------------------

लोणी येथे महाआघाडी

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील लोणी ग्रामपंचायतमध्ये काँग्रेस व शिवसेना महाआघाडीच्या पॅनलने ११ पैकी सहा जागा पटकावल्या. शिवसेनेचे बाळासाहेब भागवत व काँग्रेसचे प्रवीण सवाई यांच्या नेतृत्वात हे पॅनल लढवले गेले. भाजपला पाच जागा मिळाल्या. या निवडणुकीत मंगला शेवतकर, सूरज औतकर, रोशनी खडसे, नीलेश लोहकरे, विनय बोबडे, प्रतीक्षा आखरे, तसेच वैष्णवी तिखीले, रोशन मुंदाने, दीपक तिखले, प्रीती लोहकरे, अब्दुल अमिनाबी हे उमेदवार विजयी झाले.

---------------------------