वरूडमध्ये विवाह सोहळ्यात २५ पेक्षा अधिक वऱ्हाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:22 IST2021-03-04T04:22:40+5:302021-03-04T04:22:40+5:30

वरूड : येथील एका विवाह सोहळ्यात २५ पेक्षा अधिक वऱ्हाडी आढळून आल्याने वरपक्षाला पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. ...

More than 25 brides in a wedding ceremony in Warud | वरूडमध्ये विवाह सोहळ्यात २५ पेक्षा अधिक वऱ्हाडी

वरूडमध्ये विवाह सोहळ्यात २५ पेक्षा अधिक वऱ्हाडी

वरूड : येथील एका विवाह सोहळ्यात २५ पेक्षा अधिक वऱ्हाडी आढळून आल्याने वरपक्षाला पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. महसूल, नगरपालिका व पोलिसांनी २ मार्च रोजी ही कारवाई केली. ‘विवाह सोहळ्यात टप्प्याटप्प्याने बोलावले जातात पाहुणे’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने १ मार्च रोजी वृत्त प्रकाशित केले होते. त्या वृत्ताची दखल घेऊन आपत्ती व्यवस्थापन पथकाने स्थानिक भिकुजी नगरात सुरू असलेल्या एका घरातील विवाह सोहळ्याची तपासणी केली असता, २५ पेक्षा अधिक वऱ्हाडी आणि सामाजिक अंतराचा अभाव दिसून आल्याने वरपक्षावर पाच हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली. त्या विवाह सोहळ्याला २५ लोकांची परवानगी आपत्ती व्यवस्थापनकडून देण्यात आली होती. यानुसार भिकुजीनगरमध्ये एक विवाह सोहळा सुरू होता. येथे २५ पेक्षा अधिक पाहुणे आणि गोंधळ सुरू असल्याची माहिती मिळाल्याने प्रभारी तहसीलदार देवानंद धबाले, उपमुख्याधिकारी गौरव गाडगे, उपनिरीक्षक चव्हाण, वाहतूक जमादार अनिल माहोरे यांचे पथक तेथे पोहोचले.

Web Title: More than 25 brides in a wedding ceremony in Warud