आमदार संतापले, बैठक संपेपर्यंत अभियंत्याला जमिनीवर बसविले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 05:00 AM2020-05-27T05:00:00+5:302020-05-27T05:01:19+5:30

भातकुली तालुक्यातील तक्रारींचा मुद्दा उपस्थित झाला. पाणीपुरवठ्याच्या जबाबदाºया शाखा अभियंत्यांवर क्षेत्रनिहाय निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. भातकुलीशी संबंधित शाखा अभियंता सुनील पुरोहित यांना पाणी वितरणाचे वेळापत्रक माहिती नव्हते. पाणी वितरणावर लक्ष ठेवण्यासाठीचे निगराणी पथकही निष्क्रिय असल्याचे लक्षात आले. पाणी सोडणाऱ्यांना वाटले तर पाणी सुटते, अन्यथा दांडी मारली जाते, हे वास्तव उपस्थितांच्या नजरेत आले.

MLA angry, put engineer on the ground till the end of the meeting! | आमदार संतापले, बैठक संपेपर्यंत अभियंत्याला जमिनीवर बसविले!

आमदार संतापले, बैठक संपेपर्यंत अभियंत्याला जमिनीवर बसविले!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पाणीपुरवठ्यासंबंधीच्या बैठकीत शाखा अभियंत्याला बडनेऱ्याचे आमदार रवि राणा यांनी जमिनीवर बसण्याची शिक्षा फर्मावली. हा अफलातून प्रकार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात मंगळवारी घडला.
पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अनियमित असल्याच्या अनुषंगाने आमदार रवि राणा यांनी महापालिका, जिल्हा प्रशासन आणि जीवन प्राधिकरणाची संयुक्त बैठक घेतली.
भातकुली तालुक्यातील तक्रारींचा मुद्दा उपस्थित झाला. पाणीपुरवठ्याच्या जबाबदाºया शाखा अभियंत्यांवर क्षेत्रनिहाय निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. भातकुलीशी संबंधित शाखा अभियंता सुनील पुरोहित यांना पाणी वितरणाचे वेळापत्रक माहिती नव्हते. पाणी वितरणावर लक्ष ठेवण्यासाठीचे निगराणी पथकही निष्क्रिय असल्याचे लक्षात आले. पाणी सोडणाऱ्यांना वाटले तर पाणी सुटते, अन्यथा दांडी मारली जाते, हे वास्तव उपस्थितांच्या नजरेत आले. आमदारांनी शाखा अभियंता सुनील पुरोहित यांना जबाबदार धरले. त्यांना बोलवून प्रचंड संताप व्यक्त केला. कान धरून बसायला सांगितले. वजन जास्त असल्यामुळे कान धरताना अभियंत्याचा तोल गेला. ते कलंडले. मग आमदारांनी बैठक होईपर्यंत त्यांना खाली बसण्याची शिक्षा फर्मावली. शाखा अभियंत्यानेही ती स्वीकारली. दोन दिवसांत समस्या न सुटल्यास पुरोहित यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश अधीक्षक अभियंता सुरेश चारथड यांना आमदारांनी दिले. दरम्यान, पुरोहित यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे चारथड यांनी सांगितले. पुरोहित यांनी, प्रतिक्रिया देण्यास मात्र त्यांनी नकार दिला. आमदार रवि राणा यांनी घटनेला दुजोरा दिला. लोकांची कामे न करणाºया अधिकाºयांना यापुढेही वठणीवर आणले जाईल, अशी भूमिका स्पष्ट केली.

Web Title: MLA angry, put engineer on the ground till the end of the meeting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MLAआमदार