शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चमत्कार सादरीकरण स्पर्धा; कोंबडी संमोहित करण्याचा प्रयोग अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 6:25 PM

गणेश दुग्धप्राशन अर्थात गणपतीची मूर्ती दूध पाजण्याच्या चमत्काराला यावर्षी २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यंदा चमत्कारांचा पदार्फाश करणाऱ्या सादरीकरणांची ऑनलाईन व्हिडीओ राज्यव्यापी स्पर्धा आयोजित केली होती.

ठळक मुद्देचाकणचे अतुल सवाखंडे विजयी

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : गणेश दुग्धप्राशन अर्थात गणपतीची मूर्ती दूध पाजण्याच्या चमत्काराला यावर्षी २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यंदा चमत्कारांचा पदार्फाश करणाऱ्या सादरीकरणांची ऑनलाईन व्हिडीओ राज्यव्यापी स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये कोंबडीला संमोहित करण्याचा चाकणचे कार्यकर्ता अतुल सवाखंडे यांचा प्रयोग अव्वल ठरला. अंनिस कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांच्या गटात प्रश्नचिन्हाची करामत गुरुत्व मध्याच्या साह्याने हा आनंदी जाधव (रा. नाशिक) या चौथीच्या विद्यर्थिनीने प्रथम क्रमाक पटकावला.

स्पधेर्साठी कार्यकर्ता, कार्यकर्त्यांचे कुटुंबीय आणि खुला, असे तीन गट करण्यात आले होते. कार्यकर्त्यांसह त्यांच्या कुटुंबीयांनीही या स्पर्धेत हिरीरीने सहभाग घेतला. विशेषत: शाळकरी मुलींचा उत्साह यामध्ये आढळला. अशा प्रकारच्या या पहिल्याच स्पधेर्साठी एकूण ९० व्हिडीओ राज्याच्या कानाकोपºयातून अंनिसला प्राप्त झाले. ऑनलाईन चमत्कार सादरीकरण राज्यस्तरीय स्पर्धा २०२० मध्ये कार्यकर्ता कुटुंबीय गटात द्वितीय क्रमांक आठवीचा विद्यार्थी अमूर चैताली शिंदे (रा. ठाणे) याच्या पेटता कापूर खाणे या प्रयोगाला, तर तृतीय क्रमांक तन्वी सुषमा परेश (रा. धुळे) हिच्या काळी बाहुली नाचविणे - भूताचा खेळ संपविणे या प्रयोगाला मिळाला. सई भोसले (रा. सोलापूर) हिच्या मंत्राने अग्नी पेटविणे व विश्वा शेलार (रा. भिवंडी) हिच्या रिकाम्या हातातून नोटा काढणे या प्रयोगांना उत्तेजनार्थ क्रमांक लाभले.

अंनिस कार्यकर्ता गटात द्वितीय क्रमांक चंद्रकांत शिंदे (रा. सांगली) यांच्या साखळीत रिंग अडकवून बाहेर काढणे या प्रयोगाने, तर तृतीय क्रमांक भास्कर सदाकळे (रा. तासगाव) यांच्या रिकाम्या हातातून कुंकू काढणे या प्रयोगाने पटकावला. किशोर पाटील (रा. टिटवाळा) यांच्या कमंडलूमधून गंगा काढणे, दत्ता बोंबे (रा. कल्याण) यांच्या अतींद्रिय शक्तीने क्रूस उभा करणे आणि आशा धनाले (रा. मीरज) यांच्या पंचगव्याची पॉवर या प्रयोगांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावले. खुल्या गटातून तेजस्विनी योगेश (रा. नाशिक) यांच्या हळदीचे कुंकू करणे व धनराज रघुनाथ (रा. चंद्रपूर) यांच्या काड्यापेटीच्या काड्यांची निर्मिती या प्रयोगांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आले.

स्पधेर्चे परीक्षण चित्रपट परीक्षक अनमोल कोढाडिया आणि कोल्हापूर व अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्राचार्य मच्छिंद्रनाथ मुंडे यांनी केले. निकालाची घोषणा अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी मंगळवारी केली. स्पधेर्चे संयोजन अंनिसचे राज्य सरचिटणीस नितीनकुमार राऊत, सुरेखा भापकर, ठकसेन गोराणे, श्रेयस भारूले, अवधूत कांबळे यांनी केले.

टॅग्स :Socialसामाजिक