शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात महाशीर माशांचे कुपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:22 IST

वर्षभरापासून खाद्यच नाही, वनविभागाचे दुर्लक्ष, काही माशांचा मृत्यू अनिल कडू परतवाडा : मेळघाट प्रादेशिक वनविभागाच्या अधिकाºयांकडून महाशीर माशांचे कुपोषण ...

वर्षभरापासून खाद्यच नाही, वनविभागाचे दुर्लक्ष, काही माशांचा मृत्यू

अनिल कडू

परतवाडा : मेळघाट प्रादेशिक वनविभागाच्या अधिकाºयांकडून महाशीर माशांचे कुपोषण सुरु आहे. माशांचा राजा असलेल्या ‘महाशीर’ला वर्षभऱापासून त्याचे सकस, पौष्टीक खाद्यच दिल्या गेलेले नाही. दरम्यान काही दिवसांपासून ते मासे प्राण वायुकरिता तडफत असून यात यात काहींचा मृत्यूही झाला आहे.

तब्बल ४२ वर्षांपूर्वी मेळघाटातून हा महाशीर मासा नामशेष झाला होता. मेळघाटातमील तापी नदीत ४२ वर्षांपुर्वी तो वास्तव्यास होता. माशांचा राजा, गोड्यापाण्यातील राजा, टायगर आॅफ फ्रेशवाटर अशी या माशाची ओळख. मेळघाटातून नामशेष झालेल्या या महाशीर माशाचे मेळघाटात पूनरागमन व्हावे म्हणून राज्य जैवविविधता मंडळाने प्रायोगिक तत्वावर राज्यातला पहिला महाशीर प्रकल्प मेळघाटातील सुसर्दा वनपरिक्षेत्रांतर्गत हिराबंबई गावाला २०१४ मध्ये दिल्या गेला. हिराबंबई येथील सिंचनतलावात, जलाशयातील तरंगत्या पिंजºयात दहा हजार मत्स्यबीज सोडल्या गेलेत. महाशीर माशांचे या ठिकाणी संवर्धन केल्या गेले. यातील नरमादी मिळून ३५० मासे बाजूलाच असलेल्या सिमेंट टँकमध्ये सोडलेत. मार्च २०१९ मध्ये यातील माशांचे ग्रेडींग केल्या गेले. तेव्हा सरासरी एक ते दीड किलो वजनाचे महाशीर मासे हाती लागलेत. यातच महाशीर माशांचे पर्यावरणीय पुनर्निर्माण आणि विकासाच्या यशस्वी कार्याबद्दल या प्रकल्पाला राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवर गौरवांकीत केल्या गेले.

दरम्यान मागील वर्षभरापासून या प्रकल्पाकडे वनाधिकाºयांनी कमालीचे दुर्लक्ष चालवले आहे. या प्रकल्पातील महाशीर माशांकरीता आवश्यक सकस खाद्य वनअधिकाºयांनी बोलावलेच नाही. खरेदीच केले नाही. या सकस आहाराअभावी महाशीर माशांचे कुपोषण होत आहे. कुपोषणाचा सामना त्यांना करावा लागत आहे. यातच काही दिवसांपूर्वी महाशीर मासे ज्या टाक्यात आहेत. त्या टाक्यातील पाणी खराब झाले होते. दरम्यान त्या पाण्यातील आॅक्सिजन कमी झाला. आॅक्सिजन अभावी ते मासे त्या टाक्यातच तडफडलेत. यातील काही माशांचा वनकर्मचाºयांच्या डोळ्यादेखत मृत्यू झाला. मागील काही दिवसांपूर्वी हिराबंबईचा विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. याचा फटका या महाशीर माशांना बसला. डिझेल इंजिनची व्यवस्था असतांनाही चारदोन रुपयाचे डिझेल टाकूण त्या टाक्यातील पाणी बदलविण्याचे सौजन्यही वनअधिकाºयांनी दाखवले नाही.

राज्यमासा

मध्यप्रदेश सरकारने या महाशीर माशाला संरक्षित श्रेणी देत राज्यमासा असा दर्जा दिला आहे. नर्मदाकाठच्या लोकांसाठी महाशीर पुजनीय आहे. त्याला ते सोन्याचांदीचे अलंकारही चढवितात. महाशीर माशाला सोन्याची नथा घालुन परत नर्मदेच्या पाण्यात सोडण्याची प्रथा आहे.

कोट

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व लॉकडाऊनमुळे महाशीर माशांकरिता आवश्यक सकस आहार वर्षभरापासून पुण्यावरुन बोलावता येवू शकले नाही. महाशीर मासे ज्या टाक्यात आहेत ते पाणी बदलविण्यात आले आहे. हिराबंबई गावाचा विद्युत पुरवठा काही दिवस खंडीत झाल्यामुळे त्याचा फटका या प्रकल्पाला बसला.

- शुभांगी डेहणकर, आरएफओ, सुसर्दा

--------