शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
5
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
6
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
7
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
8
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
9
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
10
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
11
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
12
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
13
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
14
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
15
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
16
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
17
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
18
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
19
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
20
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
Daily Top 2Weekly Top 5

जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता पोहोचले जलशुद्धीकरण केंद्रावर

By admin | Updated: June 28, 2015 00:37 IST

शहरावासीयांना गढूळ पाण्याच्या पुरवठा होत असल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित करताच महाराष्ट्र जीवन ..

अधिकाऱ्यांना दक्ष राहण्याच्या सूचना : पाणीपुरवठ्यात सुधारणाअमरावती : शहरावासीयांना गढूळ पाण्याच्या पुरवठा होत असल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित करताच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभिंयता प्रशांत भामरे शनिवारी सकाळी जलशुध्दीकरण केंद्रावर पोहोचले. त्यांनी स्वत: पाणी गढुळतेची तपासणी करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाणी शुध्दतेबाबत दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पावसाच्या पाण्यामुळे सिभोंरा धरणाची जलपातळी वाढली असून विविध स्त्रोतातील पाणी धरणात ढवळले जात आहे. त्यामुळे काही प्रमाणात शहरवासीयांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. मात्र, हे पाणी गढूळ नसून पांढुरका रंगाचे असल्याचे मत जीवन प्राधिकरणाचे आहे. सिभोंरा धरणाचे पाणी अमरावतीच्या जलशुध्दीकरण केंद्रावर शुध्द करुन नागरिकांना पुरवठा केला जात आहे. मात्र, तरीही पाण्यात गढूळता आढळून येत आहे. गढूळ पाणी नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. याबाबत लोकमतने शनिवारी वृत्त प्रकाशित करताच जीवन प्राधिकरणाने लक्ष वेधले आहे. स्वत: कार्यकारी अभिंयता प्रशांत भामरे यांनी सकाळीच जलशुध्दीकरण केंद्राला भेट देऊन पाण्याची गढुळता तपासणी केली आहे. साधारणत: पाण्यात एक पीपीएमपर्यंत गढूळता आढळल्यास ते पाणी पिण्यास योग्य असल्याचे जीवन प्राधिकरणाचे मत आहे. शनिवारी भामरे यांनी स्वत: पाणी तपासणी केली असता पाण्यात ०.४ पीपीएमचीच (टरबिरीटी) गढुळता आढळून आली. पाणी गढूळ नसून ते पांढुरक्या रंगाचे दिसणारे आहे आणि ते पाणी पिण्यास योग्य असल्याचे दावा जीवन प्राधिकरणाने केला आहे. प्राधिकरण अधिकाऱ्यांनी पाणी शुध्दतेची हमी नागरिकांना द्यावी, अशी अपेक्षा काही नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)पाण्याचे २० नमुने शासकीय प्रयोगशाळेतजलशुद्धीकरण केंद्रावरील प्रयोग शाळेत दररोज पाणी तपासणी केली जाते. तसेच जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेतही पाणी नमुन्याची तपासणी करण्यात येते. सद्यस्थितीत २० पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत. पहिल्या पावसामुळे धरणातील पाणी ढवळले गेले आहे. त्यामुळे पाण्याला थोडा पांढुरका रंग आला आहे. तो रंग नाहिसा करणे शक्य नसून पाण्याची शुध्दता तपासूनच नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. पाण्यात तुरटीचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. पाणी शुद्धतेची कार्यकारी अभियंत्यांनी जलशुध्दीकरण केंद्राला भेट देऊन तपासणी केली आहे. - एस.एम.सांबापुरे, शाखा अभियंता, जलशुध्दीकरण केंद्र, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.