शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहाच्या तटावर ‘जागते रहो’

By admin | Updated: October 12, 2015 00:24 IST

मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या १२ पैकी दोन आरोपींना शनिवारी येथील मध्यवर्ती कारागृहात आणल्याच्या पार्श्वभूमिवर ...

अमरावती : मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या १२ पैकी दोन आरोपींना शनिवारी येथील मध्यवर्ती कारागृहात आणल्याच्या पार्श्वभूमिवर कारागृहाच्या तटावर रविवारपासून खडा पहारा सुरु झाला आहे. ‘जागते रहो’चे आदेश संबंधित यंत्रणेला देण्यात आले असून सुरक्षा मनोऱ्यावर बंदुकधारी रक्षक तैनात करण्यात आले आहेत.सोहेल मोहम्मद शेख (४३), तनवीर अहमद अन्सारी (४५) या आजन्म कारावासाताली दोन आरोपींना मध्यवर्ती कारागृहात हलविल्यानंतर या घडामोडी युध्दस्तरावर घडल्यात. मुंबईच्या आॅर्थर रोड, येरवडा, आणि नागपूरनंतर अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षा अत्यंत कडक असल्याची कारागृह प्रशासनात नोंद आहे. येथील मध्यवर्ती कारागृहाच्या अंडा बराकीत यापूर्वी अरुण गवळी यांनादेखील बंदिस्त ठेवण्यात आले होते. मध्यंतरी चंद्रपूर, गडचिरोली येथे नक्षली कारवाया करणाऱ्या आठ जणांना सुरक्षेच्या अनुषंगाने नागपूर कारागृहातून अमरावती मध्यवर्ती हलविण्यात आले होते. या आठही जणांना कारागृहातील अंडा बराकीत बंदिस्त ठेवण्यात आले होते. बॉम्बस्फोटातील दोन बंदिस्त आरोपी कायमयापूर्वी मुंबई बॉम्बस्फोटातील दोन आरोपींना मुंबईच्या आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहातून अमरावतीत सुरक्षेच्या अनुषंगाने बंदिस्त केले होते. या खटल्यातील सर्वच आरोपींना आजन्म कारावास झाला होता. तेव्हापासून हे दोन्ही आरोपी येथील कारागृहातच बंदिस्त असून ते शिक्षा भोगत आहेत. आता ७/११ च्या बॉम्बस्फोटातीलदोन आरोपी पाठविण्यात आले आहेत.अंडा बराकीत सुरक्षा नाहीचकारागृहातील अतिसुरक्षित अंडा बराकीत (वर्तुळ) काही वर्षांपासून कोणतेच कैदी ठेवले जात नाहीत. सर्व कैद्यांना सामान्य बराकीत ठेवण्यात येते. सूर्योदय ते सूर्यास्त असा दिनक्रम असलेल्या कैद्यांना नियमानुसार वाटचाल करावी लागते. अंडा बराकीत कैदी बंदिस्त नसल्यामुळे अतिरिक्त सुरक्षा यंत्रणा लावण्याचा बोजादेखील प्रशासनावर पडत नसल्याचे येथील चित्र आहे.