शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

न्यायमंत्री रमले वझ्झरच्या मतिमंदासोबत

By admin | Updated: August 12, 2015 00:20 IST

राज्याचे सामाजिक व न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी सोमवारी सायंकाळी ५ वाजता वझ्झर येथील स्व. अंबादासपंत ...

व्यथा जाणल्या : स्फूर्तिगीतही गायिले ‘इतनी शक्ती हमे देना दाता...!’अचलपूर : राज्याचे सामाजिक व न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी सोमवारी सायंकाळी ५ वाजता वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य मूकबधिर व मतिमंद बालगृहाला भेट दिली. अर्धा तासापेक्षा अधिक वेळ त्यांनी मतिमंद अंध मूकबधिर असलेल्या मुला-मुलींसोबत घालविला. संपूर्ण परिसराची पाहणी करून आस्थेने समस्यांची विचारपूस सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले केली. त्यांच्या या अचानक भेटीने सर्व भारावून गेले.वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य मतीमंद, अपंग व मूकबधिर बालगृहात सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले जाणार याची पुसटशी कल्पनासुद्धा कुणालाच नव्हती. सोमवारी परतवाडा येथे तीन कोटी रूपये खर्चून ७५ मुलांसाठी उभारण्यात आलेल्या वसतिगृहाच्या उद्घाटनासाठी ते आले होते. कार्यक्रम आटोपल्यावर मंत्र्याचा ताफा अचानक वझ्झरच्या दिशेने वळला. परंतु शंभर फूट अंतरावरील ही निवासी शाळा सोडून बडोले यांनी ताफा शंकरबाबा पापळकर यांच्या आश्रमात नेण्याच्या सूचना केल्यात.न्यायमंत्र्यांच्या प्रेमाने अधिकारी अवाकस्वागतासाठी आलेल्या शर्मिली नामक एका अपंग मतिमंद मुलीला राजकुमार बडोले यांनी चक्क कडेवर घेऊन आत आणले. सोबतच्या तिच्या सहकारी मुली काही न समजता या प्रसंगाला मोठ्या कौतुकाने पाहत होत्या. तर मुलीची आस्थेने विचारपूस त्यांनी केली. मंत्र्यांच्या या प्रेमाने उपस्थित अधिकारीही अवाक् झाले.पान-फुलांनी स्वागतवझ्झर येथे शंकरबाबा पापळकर यांच्या बालगृहातील मुलांनी झाडांच्या पानासह रानफुलांनी सामाजिक न्यायमंत्री बडोले यांचे स्वागत केले. यावेळी उपविभागीय अधिकारी श्यामकांत मस्के, तहसीलदार मनोज लोणारकर, ठाणेदार गिरीश बोबडे आदी उपस्थित होते. मतिमंद मुला-मुलींनी केलेल्या स्वागताने मंत्र्यांसह उपस्थित भारावून गेले. मंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा दिसताच समयसुचकता पाहता हा कार्यक्रम आखला गेला, तसेच आपल्या बालगृहात या मुलांनी टाळ्या वाजवित हसतखेळत त्यांना नेले. मंत्र्यांनी गायिले स्फूर्तिगीत‘इतनी शक्ती हमे देना दाता, मनका विश्वास कमजोर होना’, हे स्फूर्तिगीत मतीमंद अपंग मुला-मुलींसह चक्क मंत्री राजकुमार बडोले यांनी गायिले आणि मुलांमध्ये स्फूर्ती चेतविली, त्यानंतर त्यांनी बालगृहाच्या सर्व खोल्यांचे बारीकीने निरीक्षण करीत उपस्थित कर्मचाऱ्यांकडून जाणून घेतले. शंकरबाबा पापळकरांच्या कुटुंबाला भेट दिली. असे कुटुंब आयुष्यात पाहिले नाही. या सर्वांमध्ये कुठेतरी अशी अनामिक शक्ती वावरत असावी. शब्दांच्या पलीकडचेच सारे कौतुक हा शब्द अतिशय तोकडा.काय म्हणावे कळत नाही. सामाजिक न्याय देणी म्हणून माझी पूर्ण शक्ती पाठीशी आहे.- राजकुमार बडोले, सामाजिक न्यायमंत्री, महाराष्ट्र.सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या अचानक भेटीने वझ्झरसह मतिमंदांची काशी भारावून गेली. त्यांनी आस्थेने केलेली अपंग विद्यार्थ्यांची विचारपूस माझ्या मुलांना न्याय देणारी ठरली. माझ्या मुलांची दखल घेण्यासाठी सर्वांचा पुढाकार ही महत्त्वाची बाब आहे. - शंकरबाबा पापळकर, समाजसेवी.