शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएस चौकशी पथकाचा एसपी कार्यालयात तीन तास ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 05:00 IST

गुगामल वन्यजीव विभागाचा निलंबित करण्यात आलेला उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्याविरुद्ध याप्रकरणी भादंविच्या कलम ३०६ अन्वये गुन्हा नोंदविला आहे तसेच सध्या तो कारागृहात बंदिस्त आहे. निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांच्यावरही गुन्हे दाखल व्हावेत, असा रेटा वाढत आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाने रेड्डींच्या भूमिकेची चौकशीसाठी प्रज्ञा सरवदे यांच्या अध्यक्षेखाली प्राथमिक चौकशी पथक गठित केले.

ठळक मुद्देधारणी पोलिसांच्या तपासातील बारकाव्यांची पडताळणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात श्रीनिवास रेड्डींच्या भूमिकेची चौकशीसाठी अपर पोलीस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे यांच्या अध्यक्षेखाली गठित चार सदस्यीय चौकशी पथक बुधवारी अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सकाळी १० ते १ असे तब्बल तीन तास होते. धारणी पोलिसांनी दाखल केलेल्या फौजदारी प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांची या पथकाने तपासणी केली.गुगामल वन्यजीव विभागाचा निलंबित करण्यात आलेला उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्याविरुद्ध याप्रकरणी भादंविच्या कलम ३०६ अन्वये गुन्हा नोंदविला आहे तसेच सध्या तो कारागृहात बंदिस्त आहे. निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांच्यावरही गुन्हे दाखल व्हावेत, असा रेटा वाढत आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाने रेड्डींच्या भूमिकेची चौकशीसाठी प्रज्ञा सरवदे यांच्या अध्यक्षेखाली प्राथमिक चौकशी पथक गठित केले. या पथकातील पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनात २१ ते २४ एप्रिल दरम्यान चमूने दीपाली प्रकरणाशी निगडीत लोकांचे बयाण नोंदविले. २६ एप्रिल रोजी प्रज्ञा सरवदे अमरावतीत दाखल झाल्या. याच दिवशी दीपाली यांच्या पतीने नोंदविलेल्या बयाणांचे ‘क्रॉस चेकिंग’ करण्यात आले. २७ एप्रिल रोजी सरवदे यांनी हरिसाल गाठले. वनकर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविले. दीपाली यांचे शासकीय निवासस्थान तसेच काही ठिकाणी भेटी दिल्या. स्थानिकांशी संवाद साधला. आता सरवदे यांना ३० एप्रिलपर्यंत राज्य शासनाकडे चौकशी अहवाल सादर करावा लागेल. त्या बुधवारी सकाळी ९ वाजता मुंबईकडे रवाना झाल्या. तथापि, उर्वरित चमूने एसपी कार्यालय गाठले व प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली.

प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळलेआयपीएस डॉ. प्रज्ञा सरवदे यांचे चौकशी पथक २१ ते २८ एप्रिल या दरम्यान अमरावती, हरिसाल येथे दौऱ्यावर होते. मात्र, या आठ दिवसांत प्रसारमाध्यमांशी कुणीही बोलले नाही.जे काही चौकशीत असेल, तो अहवाल राज्य शासनाला सादर केला जातील, एवढेच टिपिकल उत्तर पथकाचे होते.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग