शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
4
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
6
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
7
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
8
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
9
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
10
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
11
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
12
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
13
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
14
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
15
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
16
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
17
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
18
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
19
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
20
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

नरखेड रेल्वे मार्गावरील मालगाडी अपघाताची होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 05:01 IST

डीआरएम एस.एस. केडिया यांनी नरखेड मार्गावर २२ मालगाडीचे डबे घसल्याने मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा ठपका ठेवला आहे. मात्र, अपघातस्थळी अनेक ठिकाणाहून फिशप्लेट गायब झाल्याचे त्यांच्या पाहणी दौऱ्यात लक्षात आले आहे. त्यामुळे हा अपघात नसून, घातपात असल्याचा संशय रेल्वेच्या वरिष्ठांना आला आहे. आता या अपघातप्रकरणी चौकशी नेमली जाणार आहे. या मार्गावर पहिल्यांदाच अशा मोठ्या अपघाताची नोंद झालेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अमरावती ते नरखेड रेल्वे मार्गावर वलगावनजीकच्या शिराळा येथे स्वांतत्र्यदिनाच्या मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास कोळसा घेऊन जाणाऱ्या मालगाडीचे २२ डबे घसरले. या अपघाताची चौकशी करण्याचा निर्णय भुसावळ मध्य रेल्वे विभागाचे प्रबंधकांनी घेतला आहे. त्याअनुषंगाने अमरावती रेल्वे स्थानकाचे प्रंबधक, रेल्वे सुरक्षा बलाच्या निरीक्षकांना पाचारण करण्यात आले आहे.
डीआरएम एस.एस. केडिया यांनी नरखेड मार्गावर २२ मालगाडीचे डबे घसल्याने मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा ठपका ठेवला आहे. मात्र, अपघातस्थळी अनेक ठिकाणाहून फिशप्लेट गायब झाल्याचे त्यांच्या पाहणी दौऱ्यात लक्षात आले आहे. त्यामुळे हा अपघात नसून, घातपात असल्याचा संशय रेल्वेच्या वरिष्ठांना आला आहे. आता या अपघातप्रकरणी चौकशी नेमली जाणार आहे. या मार्गावर पहिल्यांदाच अशा मोठ्या अपघाताची नोंद झालेली आहे. प्रवासी गाडीचा अपघात झाला असता तर मोठी मनुष्यहानी झाली असती, अशी नाेंदही पाहणी दौऱ्यात करण्यात आली आहे. तब्बल ४८ तासांपर्यंत अपघातग्रस्त मालगाडीचे डबे उचलण्याचे कार्य युद्धस्तरावर सुरू असल्याची माहिती आहे. अमरावती, बडनेरा, अकोला व भुसावळ येथील अभियंते, अधिकारी यांची फौज निरंतरपणे कार्यरत होती, हे विशेष.
 

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दुर्लक्ष
नरखेड रेल्वे मार्गावरून ठराविक प्रवासी गाड्यांची वाहतूक असते. तसेच हा मार्ग मालवाहतुकीसाठी वापरला जातो. या मार्गावरुन गाड्यांची संख्या कमी असल्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाच्या नोंदी हा मार्ग दुर्लक्षित आहे. नेमकी हीच बाब हेरून चोरट्यांनी रूळाच्या फिश प्लेट गायब केल्याचे दिसून येते.

वरिष्ठ सुरक्षा अधिकारी करणार चौकशी
नरखेड रेल्वे मार्गावर मालगाडीचे २२ डबे घसरल्याप्रकरणी भुसावळ विद्युत विभागाचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी हे चौकशी करणार आहेत. संबंधित अधिकाऱ्यांचे बयाण नोंदविले जाणार असून, रेल्वे रूळाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्यांवर कार्यवाही निश्चित होणार आहे. त्यानुसार भुसावळ येथे जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

 

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघात