शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दलित कुटुंबातील तिहेरी हत्याकांडाचा रिपाइंतर्फे निषेध

By admin | Updated: October 25, 2014 02:07 IST

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे एका दलित कुटुंबातील तिघांची निर्घुण हत्या करण्यात आली. मात्र अद्यापर्यत आरोपींना अटक करण्यात आली ...

अमरावती : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे एका दलित कुटुंबातील तिघांची निर्घुण हत्या करण्यात आली. मात्र अद्यापर्यत आरोपींना अटक करण्यात आली नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी येथील इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ रिपाइंच्या वतीने तिहेरी हत्याकांडाचा निषेध करण्यात आला. निदर्शकांनी आरोपींना तत्काळ अटकेची मागणी केली.रिपाइं (गवई गट) चे जिल्हा संघटक अमोल इंगळे यांच्या नेतृत्वात अहमदनगर जिल्ह्यातील तिहेरी हत्यकांडाचा निषेध नोंदवल्या गेला. अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा तसेच सोनई येथे दलित तरुणांच्या हत्याकांडाच्या घटना ताज्या असताना पाथर्डी येथील जवखेडे गावच्या दलित समाजातील जाधव कुटुंबाच्या तिहेरी हत्याकांडाचे प्रकरण उघडकीस आले आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात दलित समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना काळीमा फासणाऱ्या असल्याचा आरोप अमोल इंगळे यांनी केला. राज्यात सरकार अस्तिवात आले नाही. त्यामुळे राज्यपाल आणि राज्याचे मुख्य सचिवांनी जवखेडा या गावाला भेट दिली नाही. तिहेरी हत्याकांडाने राज्यात दलित समाज दहशतीत वावरत असून पोलिसांनी आरोपींना अटक करुन जाधव कुटूंबियांना न्याय प्रदान करावा, अशी मागणी रिपाइंच्या वतीने करण्यात आली आहे. तिहेरी हत्याकांडाचे आरोपी फरार असल्याच्या निषेधार्थ मशाल पेटवून पोलीस प्रशासनाला इशारा देण्यात आला. जिल्ह्यधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी अमोल इंगळे, उमेश इंगळे, मनोज थोरात, स्वप्नील इंगोले, प्रवीण सरोदे, संदीप गजभिये, आकाश वानखडे, अमित सोनवणे, सतीश पडघण, सागर काळे, मनीष पानतावणे, सुधीर इंगळे, मच्छींदर भगत आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)