शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
5
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
6
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
7
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
8
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
9
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
10
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
11
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
12
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
13
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
14
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
15
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
16
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
17
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
18
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
19
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
20
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
Daily Top 2Weekly Top 5

अनावधनाने तिरंगा उलटा - गटविकास अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:30 IST

चांदूर बाजार : तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी ग्रामपंचायतीवर प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ध्वजारोहण करताना प्रशासक व सचिवाच्या गलथान कारभारामुळे उलटा झेंडा फडकला. ...

चांदूर बाजार : तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी ग्रामपंचायतीवर प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ध्वजारोहण करताना प्रशासक व सचिवाच्या गलथान कारभारामुळे उलटा झेंडा फडकला. मात्र, ही चूक ४० वर्षांपासून झेंडा बांधणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून पहिल्यांदा झाल्याची कबुली गटविकास अधिकारी प्रफुल्ल भोरगडे यांनी दिली. मात्र गावातून अद्याप कोणतीच तक्रार प्राप्त न झाल्याने कारवाई थंडबसत्यात अडकली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी येथे प्रजासत्ताकदिनी ग्रामपंचायतीच्या प्रांगणात ग्रामपंचायतचे प्रशासक व विस्तार अधिकारी नारायण आमझरे यांनी ध्वजारोहण केले. यावेळी राष्ट्रध्वज उलटा फडकल्याचे दिसून आले. नंतर उपस्थितांच्या ही बाब लक्षात येताच तात्काळ उलट फडकलेला तिरंगा खाली उतरवून पुनश्च सरळ करून फडकविण्यात आला. मात्र, प्रशासक व ग्रामसेवकांनी याप्रकरणी जाहीर माफी मागितल्याने स्थानिक पोलिस स्टेशन मध्ये कोणतीही तक्रार झाली नाही.

याप्रकरणी गटविकास अधिकारी प्रफुल्ल भोरगडे यांना विचारणा केली असता, त्यांनी कोणतीच लेखी तक्रार प्राप्त नसल्याचे सांगितले. ४० वर्षांपासून ग्रामपंचायतीवर ध्वजारोहणासाठी झेंडा बांधण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यातर्फे अनावधनाने हा प्रकार घडल्याची शक्यता गटविकास अधिकारी भोरगडे यांनी वर्तवविली. मात्र, कोणतीही तक्रार प्राप्त न झाल्याने असा प्रकार घडला की नाही याला दुजोरा दिला नाही.

मात्र, उलटा तिरंगा फडकल्याचे छायाचित्र तसेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे तिरंगा उलटा फडकला, हे सिद्ध होत असले तरी अद्याप प्रशासक नारायण आमझरे व संबंधित कर्मचाऱ्यांवर कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱ्या अधिकारीची पाठराखण केली जात असल्याची तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.