गणेशोत्सवात गुलालाऐवजी गुलाब उधळा

By Admin | Updated: September 5, 2016 00:22 IST2016-09-05T00:22:09+5:302016-09-05T00:22:09+5:30

पर्यावरण, आरोग्य व सामाजिक नुकसान करणारा गुलाल उधळण्यापेक्षा या गणेशोत्सवात गुलाबांच्या पाखळ्या उधळून आनंदोत्सव साजरा करा,...

Grate the rose rather than the thorn in Ganeshotsav | गणेशोत्सवात गुलालाऐवजी गुलाब उधळा

गणेशोत्सवात गुलालाऐवजी गुलाब उधळा

दत्तात्रय मंडलिक : प्रत्येक मंडळाला देणार पाच किलो गुलाब 
नांदगाव पेठ : पर्यावरण, आरोग्य व सामाजिक नुकसान करणारा गुलाल उधळण्यापेक्षा या गणेशोत्सवात गुलाबांच्या पाखळ्या उधळून आनंदोत्सव साजरा करा, असे आवाहन पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी नांदगाव पेठ पोलीस स्टेशनच्यावतीने आयोजित शांतता समितीच्या बैठकीत बोलताना केले. गुलालविरहित गणेशोत्सव साजरा करणाऱ्या प्रत्येक गणेश मंडळाला पोलीस आयुक्तांच्या वतीने पाच किलो गुलाबपुष्प देण्याचीही घोषणा दत्तात्रय मंडलिक यांनी उपस्थितांसमोर केली.
शनिवारी सायंकाळी नांदगाव पेठ पोलीस स्टेशनच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त शांतता समिती तसेच गणेश मंडळांची बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, प्रमुख अतिथी म्हणून डीसीपी शशिकुमार मीना, सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील उपस्थित होते. नांदगाव पेठचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केल्यानंतर समिती सदस्य व गणेश मंडळांनी आपल्या समस्या व मत व्यक्त केले. शांततेच्या मागार्ने उत्सव साजरे केले तर भविष्यात पोलिसांची गरजच पडणार नाही. मिरवणुकीत गुलाल उधळवून नुकसान केल्यापेक्षा जर गुलाबांच्या पाकळ्या उधळल्या तर ख?्या अथार्ने समाजाला अपेक्षित असा उत्सव आपण साजरा करू शकणार असेही पोलीस आयुक्त म्हणाले. हद्दीतील जेही मंडळ यावर्षी गुलाला ऐवजी गुलाब पुष्प उधळतील त्या मंडळाला प्रत्येकी पाच किलो गुलाब पुष्प पोलीस आयुक्तांतर्फे दिली जातील व सोबतच त्या मंडळांचा सत्कारदेखील करण्यात येईल, असे मंडलिक यांनी घोषित केले. आयुक्तांच्या या उपक्रमाचे अनेक मंडळांनी स्वागत केले असून यावर्षी गुलालविरहित उत्सव साजरा करण्याचा संकल्प देखील काही मंडळांनी केला. शांतता समितीचे सदस्य शिवराजसिंग राठोड व नितीन हटवार यांनी पोलीस आयुक्तांसमोर आपल्या सूचना मांडल्या व गावातील पोलीस चौकी नियमित करण्याची मागणी केली. यानंतर एपीआय जाधव यांनी मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

Web Title: Grate the rose rather than the thorn in Ganeshotsav