शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्या रोखण्यात सरकार नापास

By admin | Updated: March 8, 2016 00:08 IST

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसल्यानंतरही शासन मात्र कोणताही ठोस निर्णय घेत नाही.

यशोमती ठाकूर यांचा आरोप : विकासकामांना प्रारंभतिवसा : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसल्यानंतरही शासन मात्र कोणताही ठोस निर्णय घेत नाही. हा सरकारचा नाकर्तेपणा आहे. पण आम्ही मात्र शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेसोबत आहोत, असे प्रतिपादन आ. यशोमती ठाकूर यांनी केले. खोलापूर, भातकुली येथील विकास कामांच्या शुभारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या.अध्यक्षस्थानी मुकद्दर खाँ पठाण होते. व्यासपीठावर सरिता मकेश्वर, जयंत देशमुख, हरिभाऊ मोहोड, इंदुताई कडू, आशुतोष देशमुख, गिरीश देशमुख, विजय मकेश्वर, नईम, वाहीदभाई, काजीमभाई, गफ्फार शहा, नरेंद्र मकेश्वर, मुरादभाई उपस्थित होते. यावेळी खारतळेगाव, खोलापूर, वाठोडा शुक्लेश्वर येथे सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. आ. यशोमती ठाकूर पुढे बोलताना म्हणाल्या की, विकासासाठी समन्वय आणि एकवाक्यता असायला हवी. ग्रामीण भागात अनेक समस्या, प्रश्न ऐरणीवर आले आहे. मात्र सद्याचे सरकार याबाबत पूर्णपणे उदासीन असल्यामुळे हे सरकार नेमके करते काय, असा प्रश्न उपस्थितीत होत असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, आम्ही मात्र शेतकऱ्यांच्या सोबत होतो आणि आतासुद्धा आहे. विकास कामात राजकारण करणे ही आमची परंपरा नाही त्यांना जे करायचे ते करू द्या. आपण मात्र एकजुटीने राहून त्यांना प्रत्युत्तर दिले पाहिजे. तेव्हाच आपली ताकद आणि क्षमता सिद्ध होईल, असेही त्या यावेळी म्हणाल्या. यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)