शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गॅस अनुदान १०० टक्के बँक खात्यात जमा करणार

By admin | Updated: November 11, 2014 22:33 IST

जिल्ह्यात १५ नोव्हेंबरपासून केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे मॉडिफाइड डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर फॉर एलपीजी (एमडीबीटीएल) योजना लागू करण्यात येणार असून त्या अंतर्गत एलपीजी गॅस

अमरावती : जिल्ह्यात १५ नोव्हेंबरपासून केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे मॉडिफाइड डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर फॉर एलपीजी (एमडीबीटीएल) योजना लागू करण्यात येणार असून त्या अंतर्गत एलपीजी गॅस अनुदान १०० टक्के बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी गित्ते यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात पूर्वतयारीचा आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. जिल्हा पुरवठा अधिकारी डी.के.वानखेडे, सेल्स एरिया मॅनेजर प्रिती मिश्रीकोटकर, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी अनंत खोरगडे, चौबे, जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सीधारक, भारत पेट्रोलियम, हिंदूस्थान पेट्रोलियम, सेंट्रल बँक, इंडियन आॅईल कॉपोर्रेशनचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये एलपीजी गॅस अनुदान बँकेत जमा करण्याच्या नवीन धोरणावर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात ४०५१७७ गॅस धारकांपैकी २७६०९५ गॅस धारकाचे क्रमांक हे बँक खात्याशी जोडण्यात आले आहेत. उर्वरित १२९०८२ गॅस धारक हे अद्यापही बँक खात्याशी जोडलेले नाहीत. अशा गॅस धारकांना बँक खात्याशी जोडण्याकरिता प्राधान्य देण्यात यावे, याकरिता प्रधानमंत्री जनधन योजना प्रभाविपणे राबविण्यात यावी व प्राधान्याने ज्या गॅसधारकाचे बँक खाते नाही त्यांचे खाते उघडावे. तसेच गॅस धारकांकरिता बँक शाखेत मदत कक्ष उघडण्याच्या सूचना अग्रणी बँकेच्या अधिकाऱ्यांना यावेळी जिल्हाधिकारी गिते यांनी केल्या. ही योजना नव्याने सुरु करीत असतांना जे ग्राहक, त्यांच्याकडे आधार क्रमांक उपलब्ध आहे त्यांची इच्छा असल्यास त्या क्रमांकाशीसुध्दा गॅस क्रमांक जोडणी करु शकतात. त्या करिता त्यांचा आधार क्रमांक व बँक खाते क्रमांकाच्या झेरॉक्स कॉपी गॅस एजन्सीकडे सादर कराव्यात अशा सूचना सर्व गॅस एजन्सी व बँक व्यवस्थापकांना या बैठकीत देण्यात आल्या. ज्या गॅस धारकांचे बँक खाते सद्यस्थितीत गॅस क्रमांकाशी जोडलेले नाही त्यांनी त्यांचे खाते तीन महिन्यांच्या आत तातडीने गॅस क्रमांकाशी जोडून घ्यावे.