शेतकऱ्यांद्वारे थेट घरोघरी पोहोचणार फळे, भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 05:00 IST2020-04-30T05:00:00+5:302020-04-30T05:00:56+5:30

महापालिका झोन अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक प्रभागामध्ये मोबाइल वाहनाद्वारे फळे व भाजीपाल्याची शेतकºयांकडून होम डिलिव्हरी होणार आहे. याविषयीचे निर्देश आयुक्त प्रशांत रोडे यांनी चारही झोनच्या सहायक आयुक्तांना दिले आहेत. झोन १ रामपुरी कॅम्प अंतर्गत येणाºया प्रभागांमध्ये १६ मोबाइल वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. झोन २ राजापेठ व झोन ३ हमालपुरा अंतर्गत प्रभागांमध्ये प्रत्येकी चार मोबाइल वाहनांची व्यवस्था केली आहे.

Fruits and vegetables will be delivered directly to the households by the farmers | शेतकऱ्यांद्वारे थेट घरोघरी पोहोचणार फळे, भाजीपाला

शेतकऱ्यांद्वारे थेट घरोघरी पोहोचणार फळे, भाजीपाला

ठळक मुद्देमहापालिका : परवानगी मागणाºया शेतकºयाची पडताळणी, प्रभागनिहाय ओळखपत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लॉकडाऊनचे काळात नागरिकांना ताजी फळे व भाजीपाला घरपोच देण्याच्या दृष्टीने मोबाइल वाहनाची व्यवस्था महापालिकाद्वारे करण्यात आलेली आहे. आता थेट शेतकऱ्यांचा भाजीपाला आणि फळे घरपोच मिळणार आहेत. सद्यस्थितीत शहराच्या चार झोनमध्ये अशाप्रकारे व्यवस्था करण्यात आलेली आहे.
महापालिका झोन अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक प्रभागामध्ये मोबाइल वाहनाद्वारे फळे व भाजीपाल्याची शेतकºयांकडून होम डिलिव्हरी होणार आहे. याविषयीचे निर्देश आयुक्त प्रशांत रोडे यांनी चारही झोनच्या सहायक आयुक्तांना दिले आहेत. झोन १ रामपुरी कॅम्प अंतर्गत येणाºया प्रभागांमध्ये १६ मोबाइल वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. झोन २ राजापेठ व झोन ३ हमालपुरा अंतर्गत प्रभागांमध्ये प्रत्येकी चार मोबाइल वाहनांची व्यवस्था केली आहे.
झोन ४ बडनेरा अंतर्गत येणाºया प्रभागांमध्ये दोन मोबाइल वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. अशा एकूण चार झोन अंतर्गत येणाऱ्या प्रभागामध्ये एकूण २६ मोबाइल वाहनांद्वारे शेतकरी होम डिलिव्हरी अंतर्गत भाजीपाला व फळांची विक्री करणार आहेत. यासाठी संबंधित शेतकºयांचे वाहन क्रमांक व मोबाइल क्रमांकसुद्धा प्रत्येक झोनमध्ये देण्यात आले आहेत. नागरिकांना भाजीपाला विक्रेत्याशी थेट संपर्क करावा लागणार आहे. विक्रेता त्यांना दिलेल्या प्रभागात जाऊन भाजीपाला विक्री करणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

कृषी विभागाद्वारे महापालिकेला माहिती
ज्या शेतकºयांना थेट ग्राहकांना कृषिमाल पुरवठा करावयाचा आहे, त्यांनी नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधून शेतीचे ठिकाण, गाडी क्रमांक, शेतमालाचे नाव, किती क्विंटल माल उपलब्ध आहे, याची माहिती द्यावी लागेल. शेतकऱ्याकडे स्वत:ची किंवा भाड्याची गाडी असणे आवश्यक आहे. कृषी विभागाद्वारे ही माहिती महापालिकेला देण्यात येईल. त्यानंतर महापालिकाद्वारे विशिष्ट प्रभागात फिरण्यासाठी पास मिळेल.

Web Title: Fruits and vegetables will be delivered directly to the households by the farmers