शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

विश्वास मताकडे लागले जुळ्या शहराचे लक्ष

By admin | Updated: August 6, 2015 01:29 IST

स्थानिक ‘अ’ वर्ग नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीचा फैसला ७ आॅगस्ट रोजी होणार आहे. ३४ नगरसेवकांच्या स्वाक्षरीने जिल्हाधिकाऱ्यांना अविश्वास प्रस्तावाबाबतचे निवेदन देण्यात आले होते.

लोकमत विशेष

विशेष सभा बोलावली : ७ आॅगस्टला अचलपूर नगराध्यक्षाचा फैसलानरेंद्र जावरे अचलपूरस्थानिक ‘अ’ वर्ग नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीचा फैसला ७ आॅगस्ट रोजी होणार आहे. ३४ नगरसेवकांच्या स्वाक्षरीने जिल्हाधिकाऱ्यांना अविश्वास प्रस्तावाबाबतचे निवेदन देण्यात आले होते. त्यावर ७ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभा बोलविण्यात आली आहे. अचलपूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष रंगलाल नंदवंशी यांच्या नगराध्यक्षपदाच्या खुर्चीचा वाद गत आठवड्यापासून चांगलाच रंगला आहे. अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहराची लोकसंख्या दीड लाखांच्या जवळपास असून ३८ नगरसेवक निवडून आले आहेत. जुळ्या नगरीतील बोटावर मोजता येणाऱ्या प्रभागांमध्येच सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. उर्वरित प्रभागांमध्ये मात्र समस्यांचा ढीग आहे. पाणी, वीज, कचरा आदी समस्या प्रश्न कायम असून तशी प्रभागातील नागरिकांची ओरड आहे.‘विश्वास’ ७ आॅगस्टला बसणार३० जुलै रोजी नगराध्यक्ष रंगलाल नंदवंशी यांचे विरुध्द ३४ नगरसेवकांनी अविश्वास दर्शवित जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना माजी नगराध्यक्ष अरूण वानखडेंना तसे निवेदन दिले होते. २२ जुलै रोजी नंदवंशी यांना नगराध्यक्षपदी एक वर्ष पूर्ण झाले. वर्ष पूर्ण झाल्यानंतर अविश्वास ठराव आणता येतो. अर्थातच आर्थिक कारणांमुळे गेल्या काही दिवसांपासून वाट पाहणारे काही नगरसेवक चांगलेच संतापले होते. विकास कामे होत नसल्याचा आरोप करण्यात आला. आता सात दिवसानंतर नगराध्यक्षावरील अविश्वास ‘विश्वास’ म्हणून परतणार असल्याची चर्चा नगरपालिका वर्तुळात बरीच बोलकी ठरली आहे.खुर्ची हलताच पडतात पैसेअचलपूर नगरपालिका नगराध्यक्षाची खुर्ची काही नगरसेवकांसाठी घरखर्च चालविण्याची बँक ठरली आहे. एटीएममध्ये कार्ड टाकावे लागते. येथे नगराध्यक्षांची खुर्ची हलली की नोटांचा पाऊस पडतो, हा नेहमीचा अनुभव शहरवासीयांना आहे. अविश्वासाची गडद छाया या खुर्चीवर सतत असते. नगरसेवकांचा पोळा फुटतो. स्वाक्षरी मोहीम राबविल्या जाते. यातून शेगावीचा गजानन किंवा शिर्डीचा साईबाबा प्रसन्न झाला की परतीच्या प्रवासात रिकामे खिसे भरले जातात. त्यामुळे जुळ्या शहरात आता ‘खुर्ची’ हिलाओ पैसे खिलाओ’ चा नारा चर्चिला जात आहे. आपली बाजू भक्कम -नगराध्यक्षज्या नगरसेवकांना जुळ्या शहराचा विकास पाहिजे ते आपल्या सोबत आहेत. काहींनी यात राजकारण करण्याचा प्रयत्न केला. तो फसला. येत्या ७ तारखेला अविश्वासाबद्दल विशेष सभा बोलविण्यात आली असली तरी आपली बाजू भक्कम आहे. सर्व नगरसेवक आपल्या बाजूने आहेत. अविश्वास ठराव बारगळणार असल्याचा आपणास पूर्ण विश्वास असल्याचे मत नगराध्यक्ष नंदवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.