शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग मयूरची कला शाखेत भरारी

By admin | Updated: May 26, 2016 01:19 IST

स्थानिक केशरबाई लाहोटी महाविद्यालयाचा अंध विद्यार्थी मयूर गणेश गवळी याने कला शाखेत महाविद्यालयातून प्रथम क्रमांक प्राप्त केला.

८२.३८ टक्के : केशरबाई लाहोटी महाविद्यालयअमरावती : स्थानिक केशरबाई लाहोटी महाविद्यालयाचा अंध विद्यार्थी मयूर गणेश गवळी याने कला शाखेत महाविद्यालयातून प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्याने सामान्य विद्यार्थ्यांना मागे टाकून हे यश मिळविले, हे विशेष. त्याची निकालाची टक्केवारी ८२.३८ टक्के इतकी आहे. तो नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथील मूळ रहिवासी आहे. त्याचे इयत्ता सातवीपर्यंतचे शिक्षण स्थानिक नरेंद्र भीवापूरकर अंध विद्यालयात झाले. येथूनच आपल्या आयुष्याला योग्य दिशा मिळाल्याचे तो नम्रपणे सांगतो. कुठल्याही विषयाची ट्युशन न लावता, त्याने हे यश संपादन केले आहे. नेत्रहीन असल्याने मोबाईलमध्ये सीडी डाऊनलोड करून वारंवार ते ऐकून त्याने अभ्यास केला. परीक्षेपूर्वी दोन महिने सातत्याने परिश्रम केल्याने हे यश मिळाले. शहरात राहणारे श्रीकांत तिरळकर हे त्याचे मावसभाऊ. तिरळकर कुटुंबांच्या सहकार्यानेच आपण हे यश संपादन केले, हे तो आवर्जून नमूद करतो. स्पर्धा परीक्षांच तयारी करून मोठे यश संपादन करण्याचा त्याचा मानस आहे. परंतु तत्पूर्वी योग्य अभ्यास करून शिक्षक होण्याचा व अर्थार्जन करण्याचे नियोजन त्याने केले आहे. इयत्ता दहावीतदेखील त्याने ८६ टक्के गुण मिळविले आहेत. कितीही संकटे आली तरी ध्येय विसरू नये, ध्येयप्राप्तीसाठी काहीही करण्याची तयारी हवी, असे तो म्हणतो. आपल्या यशाचे श्रेय त्याने शिक्षकांसह, पालकांना दिले आहेत.