अखेर ‘त्या’ विभागात आरोग्य तपासणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 05:00 AM2020-08-07T05:00:00+5:302020-08-07T05:01:36+5:30

जिल्हा परिषदेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पुरविलेल्या थर्मल स्क्रिनिंग व पल्स आॅक्सिमीटरचा वापर अनियमित या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच प्रशासन खडबडून जागे झाले. प्रशासनाने याबाबत कडक पावले उचलली आहेत. जिल्ह्यात सध्या कोरोना संक्रमितांचा आकडा २,७०१ वर पोहोचला आहे. जिल्हा परिषद प्रशासनातर्फे अगदी सुरुवातीपासूनच कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

Finally, the health check-up started in that section | अखेर ‘त्या’ विभागात आरोग्य तपासणी सुरू

अखेर ‘त्या’ विभागात आरोग्य तपासणी सुरू

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषद : यंत्रणेला आली जाग, थर्मल स्क्रिनिंग, ऑक्सिमीटरचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषद कार्यालयात कर्तव्य बजावण्यासाठी येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह ग्रामीण भागातून कामानिमित्त येणाऱ्या प्रत्येक अभ्यागतांची थर्मल स्क्रिनिंग व पल्स ऑक्सिमीटरने तपासणी सुरू करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पुरविलेल्या थर्मल स्क्रिनिंग व पल्स ऑक्सिमीटरचा वापर अनियमित या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच प्रशासन खडबडून जागे झाले. प्रशासनाने याबाबत कडक पावले उचलली आहेत.
जिल्ह्यात सध्या कोरोना संक्रमितांचा आकडा २,७०१ वर पोहोचला आहे. जिल्हा परिषद प्रशासनातर्फे अगदी सुरुवातीपासूनच कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्हा परिषद मुख्यालयातही कोरोना नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. मागील काही दिवसांत जिल्हा परिषदेतील काही विभागात तसेच पदाधिकाऱ्यांच्या दालनावर कार्यरत ६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील कर्मचारी व अधिकारी तसेच नागरिकांची प्रवेशव्दारावरच थर्मल स्क्रिनिंग मशिनच्या सहाय्याने रोजच्या रोज तपासणी करण्यात येत होती. तपासणी करूनच कार्यालयात करण्यात आला. याशिवाय पल्स आक्सिमिटरची व्यवस्था केली होती. परंतु याचा वापर मोजक्याच ठिकाणी नियमित रित्या केला जात होता. मात्र तर आरोग्य, पाणीपुरवठा व स्वच्छता या विभागांत अनियमित वापर होत असल्याचे वास्तव 'लोकमत'ने बुधवारी मांडताच प्रशासकीय यंत्रणेकडून दखल घेण्यात आली. परिणामी गुरुवार, ६ आॅगस्टपासून कार्यालयात येणाºया प्रत्येकाची तपासणी क रूनच आत प्रवेश दिला जात आहे.

Web Title: Finally, the health check-up started in that section

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.