शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

२२०० बॅलेट युनिट दाखल

By admin | Updated: October 7, 2014 23:26 IST

जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांपैकी ६ मतदारसंघांत निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या ही १८ ते २० च्या दरम्यान असल्याने या मतदारसंघांत अतिरिक्त बॅलेट युनिटची गरज भासणार आहे.

अमरावती : जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांपैकी ६ मतदारसंघांत निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या ही १८ ते २० च्या दरम्यान असल्याने या मतदारसंघांत अतिरिक्त बॅलेट युनिटची गरज भासणार आहे. त्यामुळे अहमदनगर येथून २ हजार २०० बॅलेट मशिन बोलविण्यात आल्या आहेत. मंगळवारी सायंकाळी या मशिन अमरावतीत पोहचल्या आहेत.गत विधानसभा निवडणुकीचा अंदाज घेऊन निवडणूक विभागाने ३ हजार ६९० बॅलेट व ३ हजार २५० कंट्रोल युनिट छत्तीसगढ राज्यातून बोलविल्या होत्या. मेळघाट व बडनेरा मतदारसंघ वगळता अन्य सहा विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची संख्या ही १८ ते २० असल्याने या सहा मतदारसंघात एक अतिरिक्त बॅलेट युनिटचा वापर करावा लागणार आहे. एका बॅलेट युनिटवर १५ उमेदवार आणि नोटा असा एकूण १६ ची मर्यादा आहे. बडनेरामध्ये १५ उमेदवार रिंगणात आहेत तर मेळघाट मतदारसंघात ६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असल्याने या दोन मतदारसंघांत एकच मतदान यंत्र प्रत्येक मतदान केंद्रावर उपयोगात आणले जाणार आहे. याशिवाय अचलपूर, दर्यापूर, तिवसा, मोर्शी, धामणगाव, अमरावती या मतदारसंघात १५ पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात असल्याने या मतदारसंघात दोन बॅलेट युनिटचा उपयोग करावा लागेल. त्यामुळे प्रशासनाने अतिरिक्त २२०० बॅलेटव कंट्रोल युनिटचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठविला होता. हा प्रस्ताव आयोगाने मंजूर करून अमरावती जिल्ह्यासाठी २२०० बॅलेट युनिट अहमदनगर येथून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हे मतदान यंत्र मंगळवारी संध्याकाळपर्यंत शहरात पोहोचल्याची माहिती निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी रवींद्र धुरजड यांनी दिली. (प्रतिनिधी)