शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘दिल्ली दरबार’चे फाईल आयुक्तांच्या बंगल्यावर

By admin | Updated: September 28, 2015 00:25 IST

तत्कालीन महसूल मंत्र्यांच्या आशीर्वादाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा परिषदेच्या जागेवर साकारण्यात आलेल्या ...

नियमबाह्य बांधकाम : ‘रंगोली पर्ल’नंतर कारवाईची प्रतीक्षाअमरावती : तत्कालीन महसूल मंत्र्यांच्या आशीर्वादाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा परिषदेच्या जागेवर साकारण्यात आलेल्या दिल्ली दरबार या हॉटेलच्या अवैध बांधकामाबाबतची फाईल महापालिका आयुक्त यांच्या बंगल्यावर असल्याची विश्वसनीय माहिती आहे. दोन दिवसांपूर्वी बडनेरा मार्गावर रंगोली पर्ल या अलिशान हॉटेलचे नियमबाह्य बांधकाम पाडल्यानंतर महापालिका प्रशासनाची नजर आता ‘दिल्ली दरबार’कडे लागली आहे. दोन दिवसांपूर्वी दिल्ली दरबार हॉटेलचा शुभारंभ करण्यात आला आहे. मात्र या हॉटेलच्या संचालकांनी पार्किंग अंतर्गत बांधकाम हे नियमबाह्य केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. मंजूर बांधकामाचे नकाशे, शासनाने दिलेली परवानगी, जागेची वस्तुस्थिती तपासणीचे काम आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी सहायक संचालक नगररचना विभागाच्या माध्यमातून केले आहे. दिल्ली दरबार हॉटेल निर्माण करताना पार्किंगची व्यवस्था करण्यात आले नाही, हे प्रथमदर्शनी दिसून येते. वरच्या माळ्यावर विनापरवानगीने हॉल निर्माण करण्यात आला आहे. नकाश मंजूर करताना तळमजल्यात पार्किग दर्शविण्यात आले होते. मात्र बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पार्किंगची जागा वापर केली जात आहे. एकूण हजार ते १२०० चौ.स्के.फूट बांधकाम नियमबाह्य असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. २४ सप्टेंबर रोजी रंगोली पर्ल व दिल्ली दरबार या दोन्ही हॉटेलचे अवैध बांधकाम पाडण्याबाबत आयुक्तांनी निर्णय घेतला होता. मात्र रंगोली पर्लचे बांधकाम पाडले. तर दिल्ली दरबार अजूनही थंडबस्त्यात आहे.