शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

धारवाडा येथील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मार्ग सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:17 IST

तिवसा : तालुक्यातील धारवाडा येथील वर्धा प्रकल्पबाधितांना १ कोटी ६८ लक्ष ७५ हजार रुपये इतके पुनवर्सन अनुदान मंजूर ...

तिवसा : तालुक्यातील धारवाडा येथील वर्धा प्रकल्पबाधितांना १ कोटी ६८ लक्ष ७५ हजार रुपये इतके पुनवर्सन अनुदान मंजूर झाले आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने २०१२ पासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला आहे.

धारवाडा येथे १७१ भूधारकांच्या घरांचे निम्न वर्धा प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रासाठी भूसंपादन करण्यात आले आहे. ज्यांची शेतजमीन किंवा गावठाणातील घरे सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादित करण्यात आली असतील, अशा बाधितांना पुनर्वसन अनुदान देण्यात येते. धारवाडा येथील १४८ प्रकल्पबाधितांना अतिरिक्त पुनवर्सन अनुदान मिळावे अशी मागणी करण्यात आली होती. २०१२ पासून ही मागणी प्रलंबित होती. बाधित झालेल्या १४८ प्रकल्पबाधितांना पुनवर्सन अनुदान देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी तेथील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन ही मागणी शासनदरबारी पोहोचवून या बाबीचा सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे महसूल व वनविभागाकडून स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

शासन निर्णयानुसार धारवाडा येथील प्रकरणांत अंतिम निवाडा घोषित करण्यात आला आहे. या निवाड्यानुसार १४८ प्रकल्पबाधितांना पुनर्वसन अनुदान मिळणार आहे. पुनर्वसन अनुदानाची रक्कम निम्न वर्धा प्रकल्प, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडून विशेष भूसंपादन अधिका-यांना पुरविण्यात येणार आहे व त्यांच्याकडून ते संबंधितांना अदा करण्यात येईल.