शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
5
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
6
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
7
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
8
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
9
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
10
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
11
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
12
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
13
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
14
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
15
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
16
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
17
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
18
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
19
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
20
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी पाळला ‘प्रोटोकॉल’

By admin | Updated: November 8, 2014 00:46 IST

दर्यापूरचे नवनियुक्त आ. रमेश बुंदिले यांना मंचावर बसावयास चक्क खुर्ची नसल्यामुळे जिल्हाधिकारी ..

अमरावती : दर्यापूरचे नवनियुक्त आ. रमेश बुंदिले यांना मंचावर बसावयास चक्क खुर्ची नसल्यामुळे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी त्यांना खुर्ची रिकामी करुन देत ‘प्रोटोकॉल’ पाळला. मात्र, आयोजकांनी काहीच सौजन्य दाखविले नाही. निमित्त होते, धारणी येथील कृषितंत्र विद्यालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचे.राज्यपाल सी. विद्यासागर राव हे मेळघाटातील आदिवासींच्या समस्या जाणून घेण्यासाठी बुधवारी धारणीत दाखल झाले. कुसुमकोट (खुर्द) येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठव्दारे संचालित कृषितंत्र विद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर खा. आनंदराव अडसूळ, आ. प्रभुदास भिलावेकर, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु रविप्रकाश दाणी, कृषी आयुक्त उमाकांत दांगट, राज्यपाल कार्यालयाचे सचिव रस्तोगी, जिल्हाधिकारी किरण गित्ते, अधिष्ठाता विलवेकर, परिमल सिंग, रुपेश रघुवंशी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुलगुरु दाणी यांनी प्रास्ताविक केले. राज्याचे कृषी आयुक्त उमाकांत दांगट, खा. आनंदराव अडसूळ यांनी मनोगतातून विचार मांडले. शेवटी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मार्गदर्शन केले. राज्यपालांचे मार्गदर्शनपर भाषण अंतिम टप्प्यात असताना आ. रमेश बुंदिले हे मंचावर आले. थेट ते खा. अडसूळ यांच्याजवळ गेलेत, खासदारांसोबत हस्तांदोलन केले. त्यांच्या या प्रकारामुळे उपस्थितांमध्ये काहीसा हशा पिकला. परंतु बुंंिदले यांना बसावयास खुर्ची नसल्यामुळे ते काही वेळ अस्वस्थ झालेत. आयोजकांनी त्यांच्यासाठी खुर्ची आणण्याची धावपळही चालविली. मात्र राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे भाषण अंतिम टप्प्यात असल्याने खुर्ची मंचावर येत नसल्याचे बघून जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी त्यांची खुर्ची रिकामी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी मंच सोडला. त्यानंतर लगेच आ. बुंदिले हे जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर आसनस्थ झाले. कार्यक्रमादरम्यान आमदारांना दहा मिनिटांपर्यंत खुर्चीची व्यवस्था न होणे, म्हणजे लोकप्रतिनिधींचा अपमान मानला गेला. मात्र जिल्हाधिकारी गित्ते यांनी लोकप्रतिनिधींसाठीचा ‘प्रोटोकॉल’ पाळल्याने त्यांच्याप्रती कुतूहल व्यक्त करण्यात आले. आ. रमेश बुंदिले यांना राज्यपालांच्या कार्यक्रमात खुर्चीसाठी ताटकळत रहावे लागल्याने ही बाब धारणीत चर्चिली गेली. (प्रतिनिधी)