शहरं
Join us  
Trending Stories
1
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
2
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
3
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
4
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
5
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
6
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
7
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
8
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
9
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
10
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
11
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
12
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
13
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
14
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
15
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
16
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
17
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
18
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
19
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
20
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
Daily Top 2Weekly Top 5

अंबा एक्स्प्रेसमध्ये तळीरामांचा धिंगाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 06:00 IST

भीम ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष राजेश वानखडे यांनी बुधवारी दिलेल्या तक्रारीनुसार, रेल्वे सेवा ही सार्वजनिक असून, डबा, प्लॅटफार्म वा रेल्वे स्थानकावर कोणतीही सामाजिक हानी होणारी बाब करता येत नाही. अंबा एक्स्प्रेसमध्ये १६ सप्टेंबर रोजी ही गाडी मुंबईकडे अमरावतीहून सायंकाळी ७.२० वाजता रवाना झाली.

ठळक मुद्देशेगाव रेल्वे स्थानकानजीकची घटना : वातानुकूलित बोगीत अपुऱ्या कपड्यांवर वाढदिवस साजरा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मुंबईकडे जाणाऱ्या अंबा एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यात चक्क मद्यपान करून सहा ते सात तळीरामांनी सहकाऱ्याचा वाढदिवस साजरा केल्याची घटना शेगाव रेल्वेस्थानकानजीक १६ सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी भीम ब्रिगेड या संघटनेने मध्य रेल्वे भुसावळ विभागाचे प्रबंधकांना डब्यातील छायाचित्रांसह तक्रार सादर करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. एसी डब्यातील प्रवासही आता असुरक्षित झाल्याचे यातून स्पष्ट होते.
भीम ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष राजेश वानखडे यांनी बुधवारी दिलेल्या तक्रारीनुसार, रेल्वे सेवा ही सार्वजनिक असून, डबा, प्लॅटफार्म वा रेल्वे स्थानकावर कोणतीही सामाजिक हानी होणारी बाब करता येत नाही. अंबा एक्स्प्रेसमध्ये १६ सप्टेंबर रोजी ही गाडी मुंबईकडे अमरावतीहून सायंकाळी ७.२० वाजता रवाना झाली. या गाडीत काही रेल्वे कर्मचारी कार्यरत होते. ही गाडी अकोल्याहून पुढे शेगाव रेल्वे स्थानकावर पोहोचताच वातानुकूलित डबा क्रमांक बी-१ मध्ये सहा ते सात जण अर्धवट कपड्यांमध्ये मद्यपान करून वाढदिवस साजरा करीत होते. त्यांच्याकडून पाच ते सहा दारूच्या बॉटल रिचविण्यात आल्या. त्यांच्या सोबतीला एक ते दोन कर्मचारीदेखील होते. मद्यपान करीत त्यांनी अक्षरश: धिंगाणा घातला. परिणामी मुंबईकडे सहकुटुंब प्रवास करणाऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. एसी डब्यातील तिकीट निरीक्षकांनी या तळीरामांच्या गोंधळाकडे दुर्लक्ष केल्याचे तक्रारीत नमूद आहे. एसी डब्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचाऱ्यांना ही बाब दिसू नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

रेल्वे डब्यात मद्यपानाची सूट दिली कोणी?
रेल्वे डब्यात सामान्य प्रवासी कचरा किंवा धूम्रपान करताना आढळून आल्यास त्याच्याकडून जबर दंड आकारण्याची तरतूद रेल्वे प्रशासनात आहे. मात्र, वातानुकूलित डब्यात तळीरामांसोबत रेल्वे कर्मचारी सहभागी होऊन केक कापतात आणि दारू प्राशन करतात; या गंभीर बाबीची दखल घेत संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भीम ब्रिगेडचे राजेश वानखडे यांनी केली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना डब्यात दारू प्राशन करण्यासारख्या असभ्य वर्तनाची सूट कोणी दिली, या दिशेने तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अमरावती एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यात काही जणांनी दारू प्राशन केल्याबाबतची तक्रार भीम ब्रिगेडकडून प्राप्त झाली आहे. हे निवेदन डीआरएमकडे पाठविले जाईल. यात कोणते कर्मचारी सहभागी झालेत, हे चौकशीअंती स्पष्ट होईल. वरिष्ठांच्या आदेशानुसार संबंधितावर कारवाई केली जाणार आहे.
- एम.एस. लोहकरे
उपप्रबंधक, अमरावती रेल्वे स्थानक .

टॅग्स :railwayरेल्वे