शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

सभापतिपदाचे स्वप्न विरले

By admin | Updated: May 15, 2015 00:12 IST

लोकप्रतिनिधींविरुद्धची तक्रार असल्यास थेट उच्च न्यायालयात दाद न मागता अगोदर जिल्हा सत्र न्यायालयात जाण्याचा सल्ला उच्च न्यायालयाने दिला.

अमरावती : लोकप्रतिनिधींविरुद्धची तक्रार असल्यास थेट उच्च न्यायालयात दाद न मागता अगोदर जिल्हा सत्र न्यायालयात जाण्याचा सल्ला उच्च न्यायालयाने दिला. आशियाबानो या जिल्हा सत्र न्यायालयात गेल्या असता प्रारंभी हे प्रकरण महापालिका आयुक्तांच्या पुढ्यात घेऊन जाण्याचा सल्ला कोर्टाने दिला. त्यानुसार पाच अपत्यांचे प्रकरण हे तत्कालीन महापालिका आयुक्त अरुण डोंगरे यांच्याकडे सुनावणीसाठी असताना आशियाबानो यांच्या वकिलांनी या प्रकरणाचा न्याय निवाडा करण्याचे अधिकार आयुक्तांना नाहीत, असा युक्तिवाद केला. त्यानुसार जिल्हा सत्र न्यायालयाने महापालिका आयुक्तांचे म्हणणे खारीज केले. सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात असताना आशियाबानो यांनी नवे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्याकडे न्यायासाठी धाव घेतली. आयुक्त गुडेवार यांनी या प्रकरणाचा खोलात तपास केला असता नगरसेविका शमीमबानो या पदावर राहू शकत नाही, असा निर्वाळा देत महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ चे कलम १० आय नुसार सदस्य अनर्ह अदेश बजावण्यात आला आहे. हा आदेश आयुक्तांच्या स्वाक्षरीने काढण्यात आला असून बुधवारी उशीरा रात्री शमीमबानो सादिक आयडीया यांना सदस्य रद्द करण्याची नोटीस बजावली आहे. महापालिका इतिहासात अपत्यप्रकरणी सदस्यावर थेट कारवाई करण्याची घटना ही पहिल्यांदाच घडली आहे. या कारवाईमुळे सदस्यांमध्ये जणू राजकीय भूकंप झाला आहे.आसिफ हुसेन यांच्यावरही गंडांतर!राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटचे स्वीकृत सदस्य आसिफ हुसेन यांच्यावरही सदस्य गमावण्याची पाळी येण्याचे संकेत आहेत. माजी नगरसेवक सलिम बेग यांनी महापालिका आयुक्तांकडे आसिफ हुसेन यांना २००१ नंतर तिसरे अपत्य असल्याची तक्रार दिली आहे. या तक्रारीवर चौकशी सुरु असून सोमवारपर्यंत आसिफ हुसेन यांच्याविरोधात असलेल्या तक्रारीवर आयुक्त गुडेवार हे निर्णय देतील, अशी दाट शक्यता आहे.बुधवारी विधी सभापती अन् गुरुवारी सदस्यत्व रद्द शमीमबानो सादिक आयडीया यांची बुधवारी विधी समिती सभापतीपदी वर्णी लागली. हा आनंद साजरा करीत असताना गुरुवारी त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याची वार्ता कानी पडताच त्यांच्या समर्थकांनी विरोधकांना चांगलेच शिव्याशाप केल्याची माहिती आहे. विधी सभापतीपद मिळाल्याचा आनंद अन् पदग्रहण सोहळ्याचे नियोजन आखत असतानाच त्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने राष्ट्रवादीच्या गोटात विरजण पडले आहे.