शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

लस आली म्हणूनी मास्क वापरेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:06 IST

पान २ ची लिड चांदूर बाजार : जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या नियंत्रित असली तरी दररोजचा आकडा ७० ते ...

पान २ ची लिड

चांदूर बाजार : जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या नियंत्रित असली तरी दररोजचा आकडा ७० ते ८० च्या घरात आहे. पूर्वीसारखा हा आकडा २०० ते २५० नसल्याने लोकांच्या बिनधास्त वागण्यात भर पडली आहे. आता तर कोरोनाचा लस आली आहे, मग भीती कशाची, असा सोईस्कर विचार करून मास्कला फाटा दिला जात आहे. सॅनिटायझर तर केव्हाचेच बाद झाले आहे.

दिवसाकाठी ३०० रुग्णसंख्या अमरावतीकरांनी अनुभवल्याने आता दिसणारी ७०/७५ ही संख्या गौण, मात्र दखलनीय आहे. तथापि, लस आली म्हणून मास्कची काय गरज, असा गैरसमज वाढत आहे.जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा तब्बल २१ हजारांच्या पुढे गेला असताना, मास्क वापरण्याचा कंटाळा केला जात आहे. फिजिकल डिन्टन्सिंगबाबतही लोक गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. त्यांना दंडित करून महसुलात भर घालण्याचा प्रशासनाकडून काहीही प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळेदेखील लोकांमधील बिनधास्तपणा वाढून कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे.

अनलॉक करताना प्रशासनाने अनेक नियमांचे पालन करण्याच्या अटी घातल्या. त्यात दुकानदारांनी स्वत: मास्कचा वापर करण्यासोबतच ग्राहकांसाठी अनिवार्य केले. याशिवाय दुकानामध्ये सॅनिटायजरची व्यवस्था करणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात एप्रिल महिन्यात पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढल्यानंतर पुढील दोन ते अडीच महिने बहुतांश रुग्ण हे बाहेरून आलेले आणि क्वारंटाईन सेंटरमध्ये असणारे होते. आता काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग कमी झाला होता. मात्र, महिनाभरापासून संसर्गाचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. कोरोना व्हायरसचे नवे धोकादायक स्वरूप प्रकट होत असून, हा संसर्ग आता पुन्हा बाधित करण्यासाठी सज्ज झाला असल्याचे चित्र आहे.

बॉक्स

कारवाईत शिथिलता

प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे काळाची गरज आहे. बाहेर वावरताना मास्कचा वापर आणि शारीर अंतर याबाबत काही लोक गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी नियमाचे पालन करून घराबाहेर पडताना मास्क लावणे, गर्दीत जाणे टाळणे, स्वछता पाळणे आवश्यक आहे. सध्या कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी होत असला तरी साथ संपलेली नसल्याने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ म्हणून प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. पोलीस व अन्य यंत्रणांकडून आता मास्क न वापरणाऱ्यांविरोधात मोहिमेला पूर्णविराम दिला गेला आहे. त्यामुळेही काही लोक मास्कला फाटा देत असल्याचे चित्र आहे.

कोट

कोरोनाबाधितांची संख्या पुर्वीच्या तुलनेत कमी दिसत असली तरी आजही एखाद्या शहर वा तालुक्यात एकाच दिवशी १८-२० रुग्ण आढळत आहेत. लस आली म्हणून स्वैर वागता येणार नाही.

- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी

---------------