शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

अपंग व्यक्ती घरकुलापासून वंचित

By admin | Updated: June 2, 2015 00:04 IST

येथून जवळच असलेल्या भातकुली तालुकाअंतर्गत मार्की येथील प्रफुल्ल बापुराव खटे यांचे वडील अपंग असूनसुध्दा त्यांना

पूर्णानगर : येथून जवळच असलेल्या भातकुली तालुकाअंतर्गत मार्की येथील प्रफुल्ल बापुराव खटे यांचे वडील अपंग असूनसुध्दा त्यांना घरकुलापासून सरपंच व सचिव यांच्या हेकेखोरपणामुळे हेतुपुरस्सर घरकुलापासून वंचित ठेवल्याचा आरोप पाठविलेल्या निवेदनातून केला आहे. सविस्तर वृत्त असे की, मार्की येथील रहिवासी असलेले प्रफुल्ल बापुराव खटे यांचे वडील अपंग असून त्यांना राहण्याकरिता निवारा नाही. ते कुडामातीच्या घरात वास्तव्य करीत आहेत. ग्रामपंचायत मार्कीचे दारिद्र्यरेषेच्या प्रमाणपत्रानुसार १४ गुण असून अनु क्र. ६९ असा आहे. ही व्यक्ती ४० टक्के अपंग आहे. या परिवाराचे कोणतीही व्यक्ती कमावती नाही. शासकीय नियमानुसार घरकुलास ही व्यक्ती पात्र असून त्यांच्या नावाची जागादेखील आहे. यासंदर्भात खटे यांनी २३ मार्च २०१५ रोजी गटविकास अधिकारी सीओ प्रकल्प संचालक के.एम. अहमद यांचेकडेदेखील निवेदन दिले आहेत. त्यांनी यासंदर्भात दखल घेऊन शासन परिपत्रक ८/९/२००८ व शासनपत्र २ जानेवारी २०१४ मध्ये निर्देशित केल्याप्रमाणे प्रत्यक्ष मौका पाहणी तथा दस्तऐवजांची तपासणी व खात्री करुन नियमाप्रमाणे कार्यवाही करावी व अहवाल पाठवावा, असे पत्र दिले. परंतु मार्की येथील ग्रामसेवकाने पाहणी केली नसून तसा अहवालदेखील पाठविला नाही. यासंदर्भात विचारणा केली असता आम्हाला तेवढेच काम आहे काय, असे सांगितल्या जाते. याप्रकरणी पूर्ण चौकशी करुन अपंग व्यक्तींना घरकूल योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी खटे परिवाराने केली आहे. अन्यथा उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. (वार्ताहर)