शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
4
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
5
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
6
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
7
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
8
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
9
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
10
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
11
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
12
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
13
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
14
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
15
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
16
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
17
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
18
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
19
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
20
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
Daily Top 2Weekly Top 5

अपंग, मतिमंद युवकाची उपचारासाठी वणवण

By admin | Updated: February 23, 2015 00:52 IST

स्थानिक सावता कॉलनीतील रहिवासी शशांक रमेश गंधे हा ९५ टक्के अंपग असून फिमोसिस आजारांच्या उपचाराकरिता वणवण भंटकती करीत आहे.

अमरावती : स्थानिक सावता कॉलनीतील रहिवासी शशांक रमेश गंधे हा ९५ टक्के अंपग असून फिमोसिस आजारांच्या उपचाराकरिता वणवण भंटकती करीत आहे. इर्विन व सुपर स्पेशालिटी या दोन्ही रुग्णालयातून शशांकला उपचार न करता सुट्टी देण्यात आल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले. शशांकला योग्य उपचार मिळावा, अशी मागणी रुग्णाचा मोठा भाऊ संदीप गंधे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली आहे. कृष्णार्पण कॉलनीजवळील सावता कॉलनी येथील रहिवासी शंशांक रमेश गंधे (२३) हा युवक ९५ टक्के अंपग व मतिमंद आहे. शशांकला फिमोसिस आजाराच्या उपचारासाठी १३ फेब्रुवारी रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे योग्य उपचार न करता शशांकला दुसऱ्याच दिवशी सुट्टी देऊन पुढील उपचारकरिता सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार शंशाकला सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारकरीता नेण्यात आले. मात्र शशांकला मधुमेह असल्याचे निदर्शनास आल्याने त्याला पुन्हा इर्विनमध्ये जाण्याचा डॉक्टरांनी दिला. तसेच २८ फेब्रुवारीला शस्त्रक्रिया करण्याचे सांगून सुट्टी सुध्दा दिली. त्यामुळे शंशाकच्या नातेवाईकांनी पुन्हा शशांकला इर्विन रुग्णालयात उपचारकरिता नेले. मात्र तेथील डॉक्टरांनी उपचार केला नाही असा आरोप शशांकचा मोठा भाऊ संदीप गंधे यांनी केला आहे. अपंग रूग्णाची ही अवहेलना तातडीने थांबवून त्याच्यावर योग्य उपचार व्हावेत, असे संदीप यांचे म्हणणे आहे.