विधानसभेतील पाठिंब्याचा निर्णय सर्वस्वी रिपाइंचाच

By Admin | Updated: May 19, 2014 23:04 IST2014-05-19T23:04:37+5:302014-05-19T23:04:37+5:30

रिपाइंची मते बसपकडे वळती झाल्यावरही गवईं अनेक गावात प्रथम क्रमांकावर राहिले. हे प्रहारच्या कार्यकर्त्यांचे यश आहे. परंतु गवईंना दिलेल्या शब्दाप्रमाणे मतदान झाले नाही,

The decision of the Legislative Assembly to support the whole of the RPI | विधानसभेतील पाठिंब्याचा निर्णय सर्वस्वी रिपाइंचाच

विधानसभेतील पाठिंब्याचा निर्णय सर्वस्वी रिपाइंचाच

अमरावती : रिपाइंची मते बसपकडे वळती झाल्यावरही गवईं अनेक गावात प्रथम क्रमांकावर राहिले. हे प्रहारच्या कार्यकर्त्यांचे यश आहे. परंतु गवईंना दिलेल्या शब्दाप्रमाणे मतदान झाले नाही, याची खंत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत प्रहारला पाठिंबा देण्याबाबतचा निर्णय सर्वस्वी रिपाइंवर अवलंबून आहे, असे आमदार बच्चू कडू यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

ते पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत मोदींची लाट होती. काँग्रेसविरोधी वातावरणामुळे या लाटेची त्सुनामी झाली. बेलोरा गावात मी स्वत: आमदार असताना व गावाचे सरपंच,पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्यदेखील प्रहारचे असताना राजेंद्र गवईंना प्रथम क्रमांकावर ठेवू शकलो नाही, याची खंत वाटत असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. धर्म, जातीच्या राजकारणात विकास कामांचे राजकारण टिकू शकत नसल्याचा विषादही त्यांनी व्यक्त केला.

Web Title: The decision of the Legislative Assembly to support the whole of the RPI