दर्यापूर तालुक्यात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 15:32 IST2017-08-18T15:31:17+5:302017-08-18T15:32:21+5:30

दर्यापूर तालुक्यातील कान्होली येथे स्वातंत्र्यदिनी सायंकाळच्या सुमारास एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली

Debtor farmer suicides in Daryapur taluka | दर्यापूर तालुक्यात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

दर्यापूर तालुक्यात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

ठळक मुद्दे दर्यापूर तालुक्यातील कान्होली येथे स्वातंत्र्यदिनी सायंकाळच्या सुमारास एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केलीज्ञानेश्वर मोतीराम सोळंके (४८) असे मृताचे नाव आहे.

अमरावती, दि. 18- दर्यापूर तालुक्यातील कान्होली येथे स्वातंत्र्यदिनी सायंकाळच्या सुमारास एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ज्ञानेश्वर मोतीराम सोळंके (४८) असे मृताचे नाव आहे. या शेतकऱ्याकडे २ एकर शेत असून त्याच्यावर अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ६० हजार रुपये कर्ज आहे. सततची नापिकी, दुबार पेरणी, मुलाचे शिक्षण याला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याचे त्यांच्या पत्नीचे म्हणणे आहे. ज्ञानेश्वर सोळंके यांच्या पश्चात पत्नीसह मुलगा, मुलगी असा आप्त परिवार आहे.

Web Title: Debtor farmer suicides in Daryapur taluka

टॅग्स :Farmerशेतकरी