शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
4
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
5
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
6
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
7
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
8
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
9
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
10
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
11
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
12
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
13
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
14
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
15
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
16
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
17
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
18
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
19
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
20
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
Daily Top 2Weekly Top 5

चिखलदरा नगर परिषदेचा अर्थसंकल्प सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:23 IST

कोरोनामुळे उत्पन्नात घट : विविध विकासकामांना प्राधान्य चिखलदरा : स्थानिक नगर परिषदेचा शिलकीचा अर्थसंकल्प नगराध्यक्ष विजया राजेंद्रसिंह सोमवंशी यांनी ...

कोरोनामुळे उत्पन्नात घट : विविध विकासकामांना प्राधान्य

चिखलदरा : स्थानिक नगर परिषदेचा शिलकीचा अर्थसंकल्प नगराध्यक्ष विजया राजेंद्रसिंह सोमवंशी यांनी मंगळवारी सादर केला. लॉकडाऊनमुळे पालिकेच्या उत्पन्नात घट झाली आहे. तथापि, विविध विकासकामांना या अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आले आहे.

महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमानुसार नगराध्यक्ष सोमवंशी यांनी सन २०२१-२२ करिता उत्पन्न व खर्चाचा वार्षिक अर्थसंकल्प सादर केला. नगर परिषदेने ९ कोटी ५६ लक्ष १८ हजार एवढ्या रकमेच्या अर्थसंकल्पास मंजुरी प्रदान केली. अध्यक्षांच्यावतीने लेखापाल प्रमोद वानखडे यांनी अंदाजपत्रक सभेसमोर वाचून दाखविले. विविध तरतुदींचे स्पष्टीकरण मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांनी सभेमध्ये केले. यावेळी उपाध्यक्ष शेख अब्दुल शेख हैदर, सभापती अरुण तायडे, राजेश मांगलेकरसह नगरसेवक कर्मचारी अनिकेत लहाने, नौरंगाबादी उपस्थित होते.

---------

अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये

नवीन आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकात मालमत्ता पुनर्मूल्यांकन, घनकचरा व्यवस्थापन, पर्यटनवाढीसाठी उपाययोजना तसेच दुर्बल घटक, दिव्यांग कल्याण, महिला व बालके विकास यांसाठी विशेष तरतूद ठेवण्यात आली आहे.

* शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानामधून पर्यटनवाढीच्या अनुषंगाने शहरातील उद्याने, सेल्फी पॉईंट विकसित करणे, दर्शनीय स्थळांचे रस्ते, शहरातील अंतर्गत रस्ते आणि नाल्या बांधकाम व विकासात्मक कामांचे नियोजन करण्यात आले. पंधराव्या वित्त आयोगांतर्गत पर्यावरणपूरक उपक्रम, रेन वॉटर हार्वेस्टिंग व सोलर पॅनल बसविण्याबाबत तरतूद करण्यात आली. विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत शहरातील दिवाबत्तीची सोय करण्यात आली आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियान पुरस्कार निधी अंतर्गत माझी वसुंधरा अभियान अंतर्गत जनजागृतीबाबत विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

कोरोना प्रादुर्भावापासून बचावासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. चौक सौंदर्यीकरण व प्रवासी कर नाका सुधारणेसाठी तरतूद करण्यात आली आहे.

----------