शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

बस ठाण्यात, पोलिसांनी घेतली प्रवाशांची झडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 06:00 IST

आसन मिळविल्यानंतर गळ्यातील १० ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र लंपास करण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. प्रवाशांची आरडाओरड आणि घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानकाबाहेर काढलेली बस चालक नीलेश धरणे व वाहक भानुदास बुंदे यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात नेली. तेथे पोलिसांनी प्रत्येक प्रवासी व बॅगची तपासणी केली. मात्र, कुणाकडेही मंगळसूत्र आढळले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावती बस स्थानकाहून एसटी बसमध्ये चढलेल्या एका प्रवासी महिलेचे मंगळसूत्र लंपास करण्यात आले. ही बाब निदर्शनास येताच चालकाने बस गाडगेनगर ठाण्यात लावली. येथे प्रत्येक प्रवाशाची पोलिसांकडून झाडाझडती घेण्यात आली. बुधवारी दुपारी हा घटनाक्रम घडला.अमरावती येथे उपचारासाठी आलेल्या स्वाती विजय अटाळकर (२६, रा. माहुली धांडे) या बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास अकोटकडे जाणाऱ्या एमएच ४० एन ९३१० क्रमांकाच्या एसटी बसमध्ये चढल्या. आसन मिळविल्यानंतर गळ्यातील १० ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र लंपास करण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. प्रवाशांची आरडाओरड आणि घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानकाबाहेर काढलेली बस चालक नीलेश धरणे व वाहक भानुदास बुंदे यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात नेली. तेथे पोलिसांनी प्रत्येक प्रवासी व बॅगची तपासणी केली. मात्र, कुणाकडेही मंगळसूत्र आढळले नाही. मंगळसूत्र उडविल्याची बाब बसस्थानकावर लक्षात आल्याने शहर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिर्यादीचे बयाण नोंदविण्याची कार्यवाही वृत्त लिहिस्तोवर सुरू होती.प्रवाशांची ना-हरकतआर्थिक स्थिती कमकुवत असलेल्या महिलेने मंगळसूत्र गमावल्याने प्रवाशांनीही तपासणीला हरकत घेतली नाही. उपनिरीक्षक गणेश अहिरे, जयसेन वानखडे, भारती इंगोले यांनी कार्यवाहीत सहभाग घेतला.बसचा दोन ठाण्यात प्रवासचोरीच्या घटनेमुळे बसमधील प्रवाशांना बराच वेळ ताटकळत राहावे लागले. सदर बस चालकाने प्रथम गाडगेनगर ठाण्याच्या आवारात नेली, तर त्यानंतर शहर कोतवाली पोलीस ठाण्यात नेण्यात आली. 

टॅग्स :Thiefचोर