यशोमती ठाकुरांचे मुलांसह रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:33 IST2021-02-05T05:33:05+5:302021-02-05T05:33:05+5:30

फोटो - तिवसा २८ एस राज्यातील तरुणांनी रक्तदान करण्याचे आवाहन तिवसा : राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ...

Blood donation by Yashomati Thakur with children | यशोमती ठाकुरांचे मुलांसह रक्तदान

यशोमती ठाकुरांचे मुलांसह रक्तदान

फोटो - तिवसा २८ एस

राज्यातील तरुणांनी रक्तदान करण्याचे आवाहन

तिवसा : राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी वडील स्वर्गीय भैयासाहेब ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त मुलगा यशवर्धन व मुलगी आकांक्षा यांच्यासमवेत तिवसा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात रक्तदान केले.

तिवसा येथे सचिन गोरे मित्र मंडळाच्यावतीने नऊ वर्षांपासून यानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. यंदा पालकमंत्री व त्यांच्या मुलांसह १८० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. अनेक वर्षांपासून आम्ही कुटुंबासह रक्तदान करतो. रक्ताच्या नात्यातून आह्मी प्रेमाचे नाते वाढवतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेनेही पुढे येऊन रक्तदान चळवळीत योगदान द्यावे, असे आवाहन ना. ठाकूर यांनी याप्रसंगी केले. वयाच्या अठराव्या वर्षांपासून रक्तदान करीत असल्याचे त्या म्हणाल्या.

यावेळी आमदार बळवंत वानखडे, काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे, आयोजक सचिन गोरे, नरेंद्र विघ्ने, प्रशिक शापामोहन आदी उपस्थित होते.

तत्पूर्वी, भय्यासाहेब ठाकूर यांच्या समाधीस्थळी सिंधी पांडी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, बबलू शेखावत, विलास इंगोले आदी उपस्थित होते.

Web Title: Blood donation by Yashomati Thakur with children