शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या आशा पल्लवित; काँग्रेस सावध

By admin | Updated: January 6, 2017 00:23 IST

नगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या यशाने भाजपाच्या आशा पल्लवित झाल्या असतानाच गेली अनेक

निवडणूक : जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी व्यूहरचना अमरावती : नगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या यशाने भाजपाच्या आशा पल्लवित झाल्या असतानाच गेली अनेक वर्षे पारंपारिक बालेकिल्यात फटका बसल्याने काँग्रेसचे नेते आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अधिक सावध झाले आहेत. काँग्रेसची पिछेहाट होत असताना ती जागा भरून काढता येईल का, असा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. तर भाजपाकडून कशी सन्मानाची वागणूक मिळते या प्रतिक्षेत शिवसेना आहे. लातूर जिल्हा परिषदेत स्थापनेपासून काँग्रेसची सत्ता आहे. काही वेळा राजकिय परिस्थितीमुळे विरोधकांचे केवळ संख्याबळ वाढले. मात्र त्यांना सत्वेचा सोपान गाठता आला नाही. सद्याच्या जिल्हा परिषदेत ५९ सदस्यांपैकी २५ सदस्या एकट्या काँग्रेसचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ७, भाजप ९, शिवसेना ८, बसपा २, रिपाइं १, प्रहार ४, जनसंग्राम २, अपक्ष १ सदस्य आहेत. तर १४ पंचायत समितीमध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस, बसपा, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षाचे सभापती आहेत. देशात व राज्यात भाजपाची सत्ता, नगरपालिका निवडणुकीत जनतेने भाजपाच्या बाजूने दिलेला कौल पाहता जिल्हा परिषद व पंचायत समितीत सत्तास्थापनेसाठी भाजपाची मंडळी वेगवेगळ्या व्यूहरचना आखत आहेत. प्आगामी निवडणुकीत एकदिलाने काम झाले तर भाजपाची सत्ता येऊ शकते, असा विश्वास भाजपाचे पदाधिकारी व्यक्त करीत आहेत. या निवडणुकीदरम्यान युतीबाबतचे चित्र मात्र अस्पष्ट आहे. त्यामुळे शिवसेनेची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे, तर काँग्रेस पक्षाने नगरपालिकेतील निकालाची दखल घेत सावधतेचा पवित्रा घेत आगामी निवडणुका पूर्ण ताकदीने लढवून जि. प., पं. स.च्या निवडणुकीत सत्तेची परंपरा या स्थानिक स्वराज्य संस्थेवर फडकविण्याची काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. (प्रतिनिधी)