शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

कानफोड्यांपासून सावधान

By admin | Updated: June 1, 2015 23:58 IST

कान साफ करणाऱ्यांकडे वैद्यकीय शिक्षणाची कोणतीही पदवी नाही. शाळेची पायरीही त्यांनी कधी चढली नाही. जागा

मळ काढण्याऐवजी अनेकांचे फोडले कान : ग्रामीण भागात फसवणुकीचे प्रकार अधिक अमरावती : कान साफ करणाऱ्यांकडे वैद्यकीय शिक्षणाची कोणतीही पदवी नाही. शाळेची पायरीही त्यांनी कधी चढली नाही. जागा मिळेल त्या ठिकाणी ते दुसऱ्यांच्या कानावर उपचार करतात. कानातील मळ काढण्याऐवजी ते थेट कानच फोडून टाकतात. कारण कान साफ करण्याचे ज्ञान नसल्याने त्यांनी अनेकांना बहिरे बनविले आहे. अशा अनेक केसेस डॉक्टरांकडे दाखल होत आहेत. यात कानफोड्यांपासून सावध राहा, असा इशाराही डॉक्टरांनी दिला आहे.शहरातील रेल्वेस्टेशन, बसस्थानक, बाजार आदी ठिकाणी हे कानातील मळ काढणारे तथाकथित डॉक्टर आढळून येतात. सुरुवातीला २0 रुपयांत मळ काढून देतो, असे त्यांच्याकडून सांगितले जाते; परंतु त्यानंतर ते कानात स्वत:जवळील काही औषध टाकतात. त्या औषधाने फेस येतो. त्यामुळे ते कानात जास्त मळ असून, गोळी तयार झालेली आहे. ती मोठी असल्याने ५० रुपयांपर्यंत खर्च येईल, असे सांगतात. घासघूस करीत त्यातून काही पैसे कमी केले जातात. अशा प्रकारचे नाटक करीत शहरातील रेल्वेस्टेशन, बसस्थानक, रविवार बाजार आदी ठिकाणी हे कानातील मळ काढणारे तथाकथित डॉक्टर आढळून येतात. सुरुवातीला २0 रुपयांत मळ काढून देतो, असे त्यांच्याकडून सांगितले जाते; परंतु त्यानंतर मात्र ते कानात स्वत:जवळील काही औषध टाकतात. त्या औषधामुळे कानात फेस येतो. याची भीती दाखवीत तुमच्या कानात खूप सारे मळ असल्याचे सांगून ते काढणे गरजेचे असल्याचे सांगतात. त्यासाठी अतिरिक्त पैशाची मागणीही ते करतात. त्यालाच नागरिक बळी पडतात. मात्र जबरीने मळ काढताना कान फोडल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे सावधगिरी बाळगावी ग्रामीण भागातील सावज शोधतात४कानातील मळ काढणारे हे मुन्नाभाई बसस्थानक, आरटीओ अशा ठिकाणी ग्रामीण भागातील व्यक्तीला गाठतात. त्यांना भावनिक करीत त्यांच्याकडून जादा पैसे उकळण्याचे काम ते करतात. ग्रामीण भागातून येणाऱ्यांना जादा माहिती नसल्याने, ते सहजच या तथाकथित डॉक्टरांच्या जाळ्यात अडकतात. ओळखू न येण्यासाठी खबरदारी४हे मुन्नाभाई दररोज एकाच ठिकाणी नसतात. दररोज एकाच भागात गेल्याने आपल्याला ओळखतील म्हणून, ते १५ ते २० दिवस पूर्वीच्या ठिकाणी जात नाहीत. आपले पितळ उघडे पडू नये यासाठी त्यांच्याकडून ही खबरदारी घेतली जाते. अन् दुसऱ्याच दिवशी फुटला कान४शहरातील एक तरुण दोन महिन्यांपूर्वी बाजारात गेला होता. तेथे त्याला कानातील मळ काढणारा एक डॉक्टर भेटला. २0 रुपयांत मळ काढून देतो, असे त्याच्याकडून सांगण्यात आले. मळ काढण्यास सुरुवात केल्यानंतर, कानात खूप मोठी मळाची गोळी तयार झाली आहे. त्यासाठी औषध टाकावे लागेल व ५0 रुपयांपर्यंत खर्च येईल, असे त्याच्याकडून सांगण्यात आले. घासाघिसीनंतर काही पैसे कमी करून, त्याने जवळील औषध टाकून मळ काढला; परंतु दुसऱ्याच दिवशी त्या तरुणाचा कान फुटला.कोणत्याही साधनाने कान कोरणे हे चांगले नाही. त्यामुळे पडद्याला छिद्र पडून, कायमचा बहिरापणा येतो. तसेच त्यामुळे कानाच्या जवळील मेंदूलाही त्याचे इन्फेकशन पोहोचू शकते. त्यामुळे कान कोरणे ही सवय चांगली नसून, कानातील मळ काढणाऱ्या बाहेरील व्यक्तीवर विश्वास ठेवू नये. -एम.एम. पाटीलकान, नाक, घसा तज्ज्ञ, अमरावती.