शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

३० मीटर अंतरातील वीज जोडण्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:15 IST

अमरावती : रोहित्रावर पर्याप्त क्षमता असलेल्या व लघुदाब वाहिनीपासून ३० मीटरपर्यंत अंतर असलेल्या परिमंडलातील शंभर टक्के शेतकऱ्यांना ...

अमरावती : रोहित्रावर पर्याप्त क्षमता असलेल्या व लघुदाब वाहिनीपासून ३० मीटरपर्यंत अंतर असलेल्या परिमंडलातील शंभर टक्के शेतकऱ्यांना नवीन कृषिपंप वीज जोडण्या फक्त १८ दिवसांत कार्यान्वित करून अमरावती परिमंडलात शासन निर्णय व महावितरणचे ‘नवीन कृषिपंप वीज जोडणी धोरण २०२०’ची अंमलबजावणी मुख्य अभियंता अमरावती परिमंडल यांच्या मार्गदर्शनात राबविणे सुरू आहे.

१ एप्रिल २०१८ नंतर पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषिपंपासाठी महावितरणकडे या अगोदर कोणतीच योजना कार्यरत नसल्याने राज्यात कृषिपंपांच्या नवीन वीज जोडण्या देण्याची प्रक्रिया ठप्प झाली होती. त्यास पुन्हा गती देण्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या पुढाकारातून आणि मार्गदर्शनात नवीन कृषिपंप वीज जोडणी धोरण २०२० प्रत्यक्षात आले. या धोरणानुसार ज्या नवीन कृषिपंपाचे अंतर लघुदाब वाहिनीच्या पोलपासून ३० मीटरच्या आत आहे व रोहित्रावर पर्याप्त क्षमता आहे, अशा सर्व ग्राहकांना एका महिन्याच्या आत वीज जोडणी देणे, लघुदाब वाहिनीपासून २०० मीटरच्या आत व रोहित्रावर पर्याप्त क्षमता शिल्लक असलेल्या नवीन कृषिपंप ग्राहकांना एरियल बंच केबलद्वारे काही अटींवर तीन महिन्यांच्या आत वीज जोडणी देण्याचे, २०० ते ६०० मीटर अंतर असलेल्या नवीन ग्राहकांना उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे व ६०० मीटरपेक्षा जास्त अंतर असलेल्या ग्राहकांना अपारंपरिक पद्धतीने सौरकृषी पंपाद्वारे वीज जोडणी देण्याचे नियोजन या धोरणात करण्यात आले आहे. ३० मीटरच्या आत अंतर असलेल्या आणि नवीन वीज जोडणीचा लाभ मिळालेल्या यामध्ये अमरावती जिल्ह्यांतर्गत महावितरण अचलपूर विभागातील २५, अमरावती ग्रामीण विभागातील १२४, मोर्शी विभागातील ९८ आणि अमरावती शहर विभागातील २ अशा एकूण २४९ शेतकऱ्यांचा समावेश आहे. यवतमाळ जिल्ह्यात महावितरणच्या यवतमाळ विभागात १२३, पुसद विभाग ११६ आणि पांढरकवढा विभागात १३८ असे एकूण ३७७ शेतकऱ्यांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.