शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

येवद्यात आजी-माजी सरपंचांवर प्राणघातक हल्ला

By admin | Updated: November 19, 2015 00:46 IST

बसथांबा परिसरातील घटनायेवदा : क्षुल्लक कारणावरुन दर्यापूर तालुक्यातील येवदा येथे मंगळवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास ...

हल्लेखोरांना अटक : बसथांबा परिसरातील घटनायेवदा : क्षुल्लक कारणावरुन दर्यापूर तालुक्यातील येवदा येथे मंगळवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास येथील आजी-माजी सरपंचावर दोन माथेफिरूंनी हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. याप्रकरणी येवदा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलीस सूत्रांनुसार, येवदा येथील माजी सरपंच बाळासाहेब राऊत मंगळवारी दर्यापूरहून येवद्याकडे आले होते. पान खाण्यासाठी बसथांब्याजवळ थांबले असता त्यांच्याशी संदीप मामनकर (२८) व विठ्ठल हिवसे (४०) यांनी शाब्दिक वाद केला. अश्लील शिवीगाळ करुन त्यांना गाडीत शिरुन बेदम मारहाण केली. मारहाणीत ते रक्तबंबाळ झाले. त्यानंतर या माथेफिरुंनी विद्यमान सरपंच प्रदीप देशमुख यांच्यावरही हल्ला केला. यावेळी देशमुख यांच्या समर्थकांनी आरोपी संदीप मामनकर याला बेदम मारहाण केली. विठ्ठल हिवसे मात्र घटनास्थळाहून पळाला. यासंदर्भात सरपंच प्रदीप देशमुख यांनी येवदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेचा अधिक तपास ठाणेदार एस.के. परकांदे करीत आहेत. पोलिसांनी आरोपीविरुध्द भादंविच्या कलम ४५२, २९४, ३२३, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. येवदा येथे गेल्या काही दिवसांपासून राजकीय गटबाजीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने शिस्तप्रिय नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.या घटनेचा अधीक तपास ठाणेदार एस.के. परकांदे, विश्वनाथ मुळे, राजकुमार तायडे, बजरंग इंगळे, मनोज गावंडे करीत आहे. गेल्या काही दिवसांपासून गावात घडत असलेल्या अप्रिय घटनांमुळे गावातील वातावरण तणावग्रस्त झाले आहे. पोलीस याप्रकरणाचा कसोशिने तपास करीत आहेत. (वार्ताहर)