शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कापसाला भाव नसल्याने खासगी बाजारात आवक थांबली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 11:21 IST

परदेशातील निर्यात बंद : दर स्थिरावले, साठवणुकीकडे कल

गजानन मोहोड 
लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती :
शेतकऱ्यांचं पांढरं सोनं असलेल्या कापसाला खुल्या बाजारात क्विंटलमागे ७१०० तर सीसीआयच्या खरेदी केंद्रांवर ७४५० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. रुई आणि सरकीच्या भाव आंतरराष्ट्रीय स्तरावर माधारले आहेत. त्यामुळे तूर्तास भाववाढीची शक्यता नाही. परदेशात कापसाची निर्यात थांबली आहे. अशा परिस्थितीत दरवाढीच्या प्रतीक्षेत कापसाची साठवण हाच पर्याय शेतकऱ्यांपुढे आहे.


जिल्ह्यात कॅश क्रॉप म्हणून कापसाची ओळख आहे. किंबहुना खरीप हंगामात कपाशीचा पेरा सरासरी क्षेत्राच्या ५० टक्क्यांपर्यंत आहे. यावर्षी जिल्हाभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस, अतिवृष्टीमुळे कपाशीच्या पिकाचे नुकसान झाले. किंबहुना देशभरात हीच स्थिती असल्याने कापसाचे सरासरी उत्पादनात कमी येत आहे. त्यातच कापसाचा उत्पादन खर्च दरवर्षी वाढत आहे. बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके यांची दरवर्षी होत असलेली दरवाढ सोबतच कापूस वेचणीचा दर १० रुपये किलोवर गेल्याने उत्पादनखर्चात वाढ होत असताना त्या तुलनेत मार्केटमध्ये भाव नाही. कापसाला सध्या उठावच नसल्याने खुल्या बाजारात आवक थंडावली आहे. थोडीफार आवक सीसीआयच्या केंद्रांवर होत आहे. तिथेही आठ टक्के आर्द्रतेच्या निकषात हमीभावापेक्षा क्विंटलमागे ५० ते १०० रुपये कमी मिळत आहेत. परंतु खासगी खरेदीपेक्षा किमान क्विंटलमागे ३०० ते ४०० रुपये जास्त मिळत असल्याने अडचणीतील शेतकरी कापूस विक्रीसाठी आणत आहेत किंवा खेडा खरेदीत देत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांची लूट होत आहे. उर्वरित शेतकरी दरवाढीच्या प्रतीक्षेत साठवणूक करीत असल्याने सध्या शेतकऱ्यांचे पांढरे सोने मातीमोल झाले आहे.


गारमेंट हब बांगलादेशात कापसाची निर्यात थांबली 
बांगलादेशात गारमेंटचा मोठा उद्योग असल्याने भारताकडून कापूस आयात केला जातो. सध्या तेथील राजकीय अस्थिरतेमुळे भारतातून होणारी निर्यात थांबली आहे. याचा फार मोठा फटका कापूस उद्योगाला बसला आहे. बांगलादेशात किमान १५ ते १६ लाख व चीनमध्ये १० ते १२ लाख गाठींची निर्यात व्हायची, यंदा निर्यात बंद असल्याने कापसाला उठाव नसल्याचे वास्तव आहे.


७० सेंट पर पाउंडवर स्थिरावला रुईचा भाव 
आंतरराष्ट्रीय बाजारात रुईचा ७० सेंट पर पाउंड (४५० ग्रॅम) असा भाव आहे. देशांतर्गत गाठीचा ५२ ते ५३ हजारांपर्यंत (१७५ किलो) भाव मिळत आहे. शिवाय सरकीलादेखील देशांतर्गत ३२०० ते ३३०० रुपये क्विंटल भाव आहे. या दरावरच सध्या बाजारभाव स्थिरावला आहे. त्यामुळे कापसाच्या दरात वाढ झालेली नसल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.


"आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मागणी नाही. परदेशात जाणारी निर्यात थांबली आहे. त्यामुळे खासगी खरेदीत कापसाची आवक थंडावली आहे. थोडीफार खरेदी सीसीआयच्या केंद्रांवर होत आहे."
- पवन देशमुख, शेतमाल दराचे अभ्यासक.

टॅग्स :Amravatiअमरावती