शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

मोर्शीकडे येणारा शस्त्रसाठा जप्त, तीन आरोपींना अटक

By admin | Updated: February 18, 2015 00:02 IST

जिल्हा वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोर्शीकडे येणारा घातक शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला. पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

मोर्शी : जिल्हा वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोर्शीकडे येणारा घातक शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला. पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.पोलीस सूत्रानुसार, या घटनेतील आरोपींमध्ये आॅटोरिक्षा चालक सैजाद खान मुजप्फर खान, जुगलसिंग बादलसिंग बावरी, बालसिंग सोनसिंग बावरी, (तिघेही रा तळेगाव शामजीपंत) यांचा समावेश आहे. येथून ८ किमी अंतरावर असलेल्या सालबर्डी येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरते. या महोत्सवानिमित्त जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे मोठया प्रमाणात सतर्कता बाळगली जाते. जिल्हा पोलिस वाहतूक शाखासुद्धा तपासात तैनात आहे. सोमवारी वाहतूक शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन, पोलिसांनी मोर्शीकडे येणाऱ्या वाहनांची तपासणी मोहीम सुरु केली होती. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास सिंभोरा मार्गावर अश्याच रितीने तपासणी सुरु असताना मोर्शी वाहतूक शाखेचे अरुण साबळे यांनी आॅटो एम.एच. ३२ बी ८६६४ ला अडवून त्याची तपासणी केली. आॅटोरिक्षात एका प्लास्टिकच्या गोणपाटात एकूण पाच तलवारी आणि १० गुप्त्या आढळून आल्यात. हा शस्त्रसाठा आॅटोरिक्षासह जप्त करण्यात आला. शिवाय आॅटो चालक सैजाद खान (३५), जुगलसिंग बालसिंग बावरी, बालसिंग सोनूसिंग बावरी तिघेही तळेगाव शामजी पंत यांना आर्म्स अ‍ॅक्टच्या कलम ४/२५ आणि मुंबई पोलिस कायद्याच्या कलम १३५ प्रमाणे अटक करण्यात आली. यात्रा कालावधी शिवाय मोर्शीला या पूर्वी घडलेल्या काही घटनांच्या अनुषंगाने संबंधित आरोपी एवढा मोठा शस्त्रसाठा कोठे आणि कशासाठी नेत होते किंवा कोणाला विकणार होते या बाबीच्या तपासाकरीता आरोपींची पोलिस कोठडी घेण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक अविनाश इंगळे हे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)