शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अन् त्या उद्ध्वस्त बागेत फुलला वसंत !

By admin | Updated: October 5, 2015 00:32 IST

सद्यस्थितीत शेतकरी आत्महत्या हा विषय गाजवतोय. शेतकरी आत्महत्या करण्यामागे अनेक कारणे असली तरी त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांच्या वाट्याला येणाऱ्या वेदना,....

शेतकरी आत्महत्या : भावाने सावरले भावाचे कुटुंबश्याम कळमकर भंडारजसद्यस्थितीत शेतकरी आत्महत्या हा विषय गाजवतोय. शेतकरी आत्महत्या करण्यामागे अनेक कारणे असली तरी त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांच्या वाट्याला येणाऱ्या वेदना, यातना आणि हालअपेष्टा मात्र अपरिमित असतात. अकाली कर्ता पुरूष निघून गेल्यानंतर उघड्यावर पडलेले कित्येक संसार आजही सावरलेले नाहीत. पण, अंजनगावात मोठ्या भावाच्या आत्महत्येनंतर उघड्यावर आलेले त्याचे कुटुंब सावरण्यासाठी लहान भावाने उचललेले पाऊल निश्चितच कौतुकास्पद आणि आदर्श असे आहे. २०१० साली अंजनगाव सुर्जी येथील नरेंद्र प्रल्हाद ताडे नामक एका तरूण शेतकऱ्याने भंडारज-अडगाव मार्गावरील स्वत:च्याच शेतातील झोपडीत विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. मागे राहिली ती त्याची पत्नी दीपाली आणि दोन वर्षांचा मुलगा सारंग. विशाल जगात निराधार जगावे कसे, असा प्रश्न दीपालीसमोर उभा होता. मात्र, महेंद्र ताडे नरेंद्रचा लहान भाऊ याने क्रांतिकारी पाऊल उचलले. त्याने भावाचा उघड्यावर पडलेला संसार सावरण्याचा निर्णय घेतला आणि दीपालीसोबत विवाह केला. आज तीन वर्षांपासून त्यांचा संसार सुस्थितीत बहरला आहे. दीपालीच्या उद्ध्वस्त आयुष्यात वसंत फुलला आहे. समाजानेही दीपाली आणि महेंद्रच्या विवाहाला मूकसमंती आणि मूकसन्मानही दिला. अंजनगाव सुर्जी येथे बहुसंख्य बारी समाज आहे. शेती, शेतमजुरी, विड्याच्या पानांची विक्री आणि पानपिंपरी असा येथील नागरिकांचा पूर्वापार चालत आलेला व्यवसाय आहे. आजही या समाजाकडे अशिक्षित अडाणी समाज म्हणून पाहिले जाते. परंतु या समाजातील युवकाने घेतलेल्या एका धाडसी निर्णयामुळे एक उद्ध्वस्त संसार पुन्हा फुलला, हे वास्तव आहे. महेंद्र आणि दीपालीचा संसार वेलीवरही आता नीरज नावाचे एक फूल उमलले आहे. परिस्थितीशी झगडून एक दु:खी संसार आज बहरतो आहे.