शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती महापालिकेवर ३५० कोटींची देणी, २२ कोटींचे कर्ज तर रोजचा खर्च किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 16:07 IST

Amravati : चार वर्षाच्या अमरावती प्रशासकराजनंतर महापालिकेवर लोकनियुक्त कारभाराचा नवा अध्याय सुरू होणार आहे. ६ फेब्रुवारी रोजी महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक होणार असून त्यानंतर 'नवा गडी, नवा राज' असे समीकरण उद्यास येईल.

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
चार वर्षाच्या अमरावती प्रशासकराजनंतर महापालिकेवर लोकनियुक्त कारभाराचा नवा अध्याय सुरू होणार आहे. ६ फेब्रुवारी रोजी महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक होणार असून त्यानंतर 'नवा गडी, नवा राज' असे समीकरण उद्यास येईल. महापौरांच्या नेतृत्वाखाली शहराची सूत्रे पुन्हा लोकप्रतिनिधींच्या हाती जाणार आहे. मात्र प्रशासकराज काळात बेसुमार अनावश्यक खर्च आणि नियोजनाचा अभावामुळे तिजोरी रिकामी झाली आहे. अशातच आस्थापनाचा खर्च दिवसेगणिक वाढत चालल्याने कर्जाचा डोलारादेखील वाढत आहे. आजमितीला अमरावती महापालिकेला ३५० कोटींची देणी आहे. २२ कोटींचे कर्ज आहे, तर रोजचा खर्च ८ कोटी एवढा लागतो. १५ जानेवारीला निवडणूक होऊन १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर लागला. मात्र एकाही पक्षाला बहुमत मिळाले नाही. महायुतीची सत्ता स्थापन होणार असून नवनियुक्त सदस्य विविधांगी विकासाचे स्वप्न घेऊन महापालिकेत येणार आहेत.

३५० कोटींची देणी

महापालिकेवर विविध स्वरूपात सुमारे ३५० कोटींची देणी आहे. खर्चाच्या तुलनेत उत्पन्नाची साधने फारच तोकडी आहे. पाणीपुरवठा, वीज देयके, पुरवठदार, कंत्राटदारांची मोठी रक्कम थकबाकी आहे. स्वच्छतेवर सर्वाधिक खर्च होत असला तरी नागरिकांचे समाधान होत नाही, हे वास्तव आहे.

भरपूर आश्वासने दिली

महापालिका निवडणुकीच्या काळात उमेदवार अथवा राजकीय पक्षाकडून मतदारांना विकासाची भरपूर आश्वासने देण्यात आली आहे. त्यामुळे नगरसेवकांना शासनाकडून महापालिका निधी येण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

जीएसटीतून १६.७५ लाख

महापालिकेला दरमहा शासनाकडून जीएसटीचे १६ लाख ७५ हजार एवढी रक्कम मिळते. एकंदरीत आर्थिक बाजू नाजूक असून ती सावरण्यासाठी नवनिर्वाचित नगरसेवकांना सहकार्य करावे लागेल, हे सत्य आहे.

दरमहा २६ कोटींचा खर्च

अमरावती महापालिकेला दरमहा २६ कोटींचा खर्च लागतो, ही लेखा विभागाची ऑडिटची आकडेवारी आहे. यात कर्मचारी वेतन १८ कोटी, वीजबिल १.५० कोटी, कंत्राटी मनुष्यबळ पुरवठा २ कोटी, स्वच्छता व साफसफाई ३ कोटी असा ढोबळमानाने निधी लागत असल्याची माहिती आहे.

करातून दरमहा साधारणतः दोन कोटी

महापालिकेला मालमत्ता करातून साधारणतः महिन्याकाठी दोन कोटी रुपये येतात. तर सहायक संचालक नगर रचना विभाग आणि बाजार परवाना विभागाचे उत्पन्नही मर्यादित आहे.

"आर्थिक बाजू जेमतेम आहे. उत्पन्नाची साधने वाढवावी लागेल. ३५० कोटींची देणी, २२ कोटींचे कर्ज आहे. येत्या काही दिवसांत लोकनियुक्त कारभार सुरू होणार आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या सामोपचाराने विकासाची सांगड घालावी लागेल."
- दत्तात्रेय फिस्के, लेखाधिकारी महापालिका
 

English
हिंदी सारांश
Web Title : Amravati Corporation burdened with debt; high daily expenses revealed.

Web Summary : Amravati Municipal Corporation faces ₹350 crore debt, ₹22 crore loan, and ₹8 crore daily expenses. Upcoming elections bring hope for improved financial management and development initiatives under new leadership.
टॅग्स :Amravati Municipal Corporation Electionअमरावती महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Amravatiअमरावती