इर्विनमधील सर्व विभाग ‘कनेक्ट’

By Admin | Updated: May 19, 2014 23:05 IST2014-05-19T23:05:20+5:302014-05-19T23:05:20+5:30

जिल्हा सामान्य रुग्णालयातील अंतर्गत दूरध्वनी यंत्रणा मागील दीड वर्षांपासून बंद होती. त्यामुळे रुग्णालयातील सर्व विभागांचे संपर्क तुटले होते; मात्र दीर्घ प्रतीक्षेनंतर ही यंत्रणा सुरु करण्यात

All departments of Irvine 'Connect' | इर्विनमधील सर्व विभाग ‘कनेक्ट’

इर्विनमधील सर्व विभाग ‘कनेक्ट’

अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अंतर्गत दूरध्वनी यंत्रणा मागील दीड वर्षांपासून बंद होती. त्यामुळे रुग्णालयातील सर्व विभागांचे संपर्क तुटले होते; मात्र दीर्घ प्रतीक्षेनंतर ही यंत्रणा सुरु करण्यात आली आहे. सद्यस्थितीत रुग्णालयातील १00 ठिकाणी दूूरध्वनी सेवा सुरु झाली आहे. परंतु ही जबाबदारी पार पाडण्याकरिता एकच ऑपरेटर उपलब्ध असल्याचे दिसते.

जिल्हाभरातील रुग्णांना नि:शुल्क आरोग्य सेवा पुरविणारे जिल्हा सामान्य रुग्णालय प्रगतीपथावर आहे. रुग्णालयातील अपुर्‍या सेवा पूर्णत्वाकडे नेण्याची प्रक्रिया वेगात सुरु आहे. गेल्या काही दिवसांत मेट्रो रक्तपेढीचे बांधकाम केले गेले. तसेच १५ व १६ क्रमांकाच्या वॉर्डात टाईल्स बसविण्यात आल्या आहेत. अन्य कामे सुरुच आहेत. गेल्या दीड वर्षांपासून रुग्णालयातील टेलिकॉम सेवा देणारे यंत्र बिघडल्याने येथील कामकाज थंडावले होते. येथील एका दूरध्वनीवरुन रुग्णालयातील अन्य विभागातील केवळ दहा दूरध्वनींवरच संपर्क करण्याची सुविधा आहे. मात्र, आता या दूरध्वनीवरुन इतर सर्व विभागात संपर्क करण्यासाठी नवीन यंत्र उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

अंतर्गत दूरध्वनी यंत्रणेचे नवीन यंत्र उपलब्ध झाल्याने रुग्णालयातील १00 पेक्षा अधिक दूरध्वनींवर एकाच ठिकाणाहून संपर्क साधता येऊ शकतो.

रूग्णालयाचा प्रत्येक विभाग आता दूरध्वनीशी

कनेक्टझाला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात १६ वॉर्ड आहेत. तसेच आरोग्य यंत्रणा सांभाळणारे शेकडो विभाग आहेत. या सर्व विभागांची आता चांगली सोय झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: All departments of Irvine 'Connect'