शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

विमानाने करणार वैवाहिक जीवनाचा प्रारंभ

By admin | Updated: May 19, 2015 00:18 IST

प्रहार व सत्यशोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्था, पूर्णामाय अपंग-अनाथ पुनर्वसन केंद्राद्वारा आयोजित सामूहिक विवाह....

१२ आदिवासी जोडपे सहभागी : प्रहारच्यावतीने सामूहिक विवाह सोहळाचांदूरबाजार : प्रहार व सत्यशोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्था, पूर्णामाय अपंग-अनाथ पुनर्वसन केंद्राद्वारा आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात १६ जोडपे विवाहबद्ध झाले. यावेळी ३ हजार आप्तस्वकीय व हितचिंतकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सामूहिक विवाह सोहळ्यात १२ आदिवासी जोडपे सहभागी झाले होते. गुरुवारी पार पडलेल्या या सोहळ्यात आ. बच्चू कडू यांच्यातर्फे यशस्वी जोडप्यांना दुचाकी व विमान प्रवासाची अनोखी भेट देण्यात आली. दोन आदिवासी जोडपे बक्षिसांचे मानकरी ठरले. संदीप वाघमारे नानोरी व सुमित्रा बेठेकर काटकुंभ या जोडप्यांना नागपूर-मुंबई असा विमान प्रवासाचा लाभ घेता येणार आहे. रवींद्र मरकाम जीवनपुरा अचलपूर व चंद्रकला धुर्वे घाटलाडकी या जोडप्याने विवाह संपन्न होताच दुचाकीने आपल्या संसाराचा प्रवास सुरू केला आहे.दुष्काळात होरपळून निघालेल्या शेतकरी, शेतमजूर व कष्टकऱ्यांची विवाह सोहळ्यातील आर्थिक अडचण दूर करण्यासाठी व यातून उद्भवणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी पूर्णामाय अपंग-अनाथ पुनर्वसन केंद्रात प्रहारच्यावतीने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. या सामूहिक विवाह सोहळ्यात अचलपूर मतदारसंघातील व त्याबाहेरील १६ जोडप्यांचे ३२ कुटुंब सहभागी झाले होते. यामध्ये एका जोडप्याकडील २०० आप्तेष्टांनी जेवणाची व्यवस्था केली होती. या सोहळ्यात अचलपूर उपविभागासह मध्यप्रदेशातील आदिवासी जोडपेही सहभागी होते. हा सामूहिक विवाह सोहळा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सुरू केलेल्या गुरूदेव पद्धतीने करण्यात आला.या विवाह सोहळ्यात सुमारे ३ हजार लोकांनी सामूहिक योजनाचा लाभ घेतला. अडचणीत सापडलेल्या पित्याला मुलींचे विवाह करण्याची चिंंता लागलेली असते, अशा सामूहिक विवाह सोहळ्यामुळे खर्चाची बचत होते. (तालुका प्रतिनिधी)