शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

‘एनआरएचएम’ला सामावून घ्या

By admin | Updated: October 14, 2016 00:56 IST

राज्यातील आरोग्य विभागात शेकडो पदे रिक्त आहेत. याच जागांवर एनआरएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घेणे सोईचे आहे.

संजय खोडके : धरणे आंदोलनाला भेट, समस्या जाणल्यातअमरावती : राज्यातील आरोग्य विभागात शेकडो पदे रिक्त आहेत. याच जागांवर एनआरएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घेणे सोईचे आहे. त्याकरिता नवीन पदभरती किंवा मान्यतेची गरज नसल्याची स्पष्टोक्ती काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांनी गुरुवारी येथे दिली.राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने येत्या वर्षात सेवेतून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमिवर जिल्हा परिषदेसमोर कर्मचाऱ्यांनी एक दिवशीय धरणे आंदोलन पुकारले होते. या आंदोलन स्थळी भेट देताना संजय खोडके मार्गदर्शन करताना बोलत होते. खोडके यांनी केंद्र सरकारने सन २००५ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान सुरू केले होते. शिक्षण आणि आरोग्य या दोन बाबी मूलभूत असल्याचे केंद्रस्थानी गृहित धरून हा उपक्रम राबविण्यात आला. मात्र आघाडी सरकार पायउतार होताच भाजप सरकारने हे दोन्ही उपक्रम गुंडाळण्याचा घाट रचल्याचा आरोप काँग्रेसचे संजय खोडके यांनी केला. राज्यात एनआरएचएमचे सुमारे १८ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. आरोग्य विभागात विविध पदे रिक्त असून त्या जागेवर कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घेणे राज्य शासनाचे कर्तव्य आहे. पंरतु राज्य शासन आंदोलन कसे चिरडून टाकता येईल, याचे सूक्ष्म नियोजन करीत आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे विनाअनुदानित शिक्षकाच्या मोर्चात लाठीमार करून त्यांना सळो की पळो करून सोडले. यात काहींवर खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आले. अन्यायाविरुद्ध लढा उभारू नये, अशी भूमिका शासनाची असून एनआरएचएमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्यायसाठी प्रदीर्घ लढा द्यावा लागेल, असेही खोडके म्हणाले. यावेळी बंड्या साने, प्रशांत जोशी, रुपेश सरदार, प्रफुल्ल रिदोरे, अभिषेक जिरापुरे, किशोर माहुरे, सोनाली बारबुद्धे, शशीकांत तभाने, विनोद मकेश्वर, रतन छापानी, निलेश देवीकर, पंकज औरंगपुरे, महेंद्र अंबुलकर, पी.एस. झांबडे, राजू जांगजोड, दीपक सहारे, प्रसाद अनासाने उपस्थित होते.