शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

‘गोडे’च्या विद्यार्थ्यांनी निर्मिले अद्ययावत ‘थ्रीडी प्रिंटर’

By admin | Updated: May 31, 2016 00:26 IST

अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन क्षेत्रात अग्रेसर असलेल्या डॉ. राजेंद्र गोडे इन्स्टिीट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, अमरावती ....

क्रांती : मेकॅनिकल अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा अविष्कार, अमरावती : अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन क्षेत्रात अग्रेसर असलेल्या डॉ. राजेंद्र गोडे इन्स्टिीट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, अमरावती येथील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या विद्यार्थी व शिक्षक वर्गाद्वारे ‘अद्ययावत थ्रिडी प्रिंटर’चे संशोधन निर्माण करण्यात आले आहे. विविध उपकरणांचे व पार्ट्सचे थ्रिडी प्रतिकृती (छोटे नमुने) तयार करण्यासाठी लागणारा अधिक पैसा, वेळ व त्यापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी राजेंद्र गोडे इंस्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, अमरावती येथील मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागाच्या विद्यार्थी व शिक्षक वर्गाद्वारे ‘अद्ययावत थ्रिडी प्रिंटर’चे संशोधन व निर्माण करण्यात आले आहे. हे थ्रिडी प्रिंटर सध्या बाजारात वापरले जाणाऱ्या थ्रिडी प्रिंटरपेक्षा स्वस्त व गतिमान राहील. त्यापासून बनविण्यात येणाऱ्या थ्रीडी प्रतिकृती तयार करण्यासाठी लागणारा वेळ व खर्च अतिशय कमी होणार आहे. या प्रिन्टरच्या संशोधन व निर्माणामुळे आता उद्योगक्षेत्रातील निर्मितीमध्ये नवीन क्रांती घडून येणार आहे. त्यामुळे बाजारात उपलब्ध थ्रीडी प्रिंटरच्या तुलनेत या थ्रीडी प्रिंटरची किंमत अत्यल्प राहणार आहे. याचा फायदा उद्योगक्षेत्रात होईलच. परंतु सामान्य जनतेलासुद्धा याचा फायदा होणार आहे. उद्योगात निर्मितीसाठी सबट्रॅक्शन मेथड’वापरण्यात येते. त्यामुळे प्रतिकृती तयार करताना लागणाऱ्या साहित्याचे मोठे नुकसान होते. परंतु या थ्रीडी प्रिंटरमध्ये अ‍ॅडीशन मेथड वापरण्यात आली आहे. त्यामुळे प्रतिकृती तयार करताना लागणाऱ्या साहित्याचे नुकसान होणार नाही. हे थ्रीडी प्रिंटर संगणकावरील एस. पद्धतीवर आधारित असून याचा उपयोग प्रतिकृती थर बाय थर तयार करण्यासाठी केला जातो. याची अचुकता ५० मायक्रॉन (केसाच्या जाडीपेक्षा अर्धी जाडी) इतकी आहे. याचे रिझोल्युशन १२०० पॉर्इंट पर इंच इतके उच्च कोटीचे आहे. हे थ्रीडी प्रिंटर तयार करण्यासाठी अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन क्षेत्रात सुप्रसिद्ध असलेले व २९ च्या वर पेटेंड ज्यांच्या नावे आहे, असे डॉ. व्हि.टी. इंगोले, संचालक, डॉ. राजेंद्र गोडे इंस्टीट्युट आॅफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, अमरावती व मेकॅनिकल विभागाचे विवेक डी.टांगे यांच्या मार्गदर्शनात अंतिम वर्षाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागामधील लोकेश सरोदे, तेजस बमनोटे, दीपेश बोरघाटे, आदित्य मिसाळ, रोहित खडसे आदी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. त्यांना प्राचार्य एस.जी. पाटील, विभागप्रमुख एस.एस. दांडगे, हेमंत आर. देशमुख, आर.एम. देशमुख, ए.पी.पचगाडे, शशिकांत देशमुख, अभिजित शहाडे यांनी कौतुक केले.