शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
3
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
4
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
5
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
7
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
10
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
11
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
12
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
13
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
14
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
15
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
16
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
17
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
18
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
19
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
20
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

३९ गावे नळांविना!

By admin | Updated: December 14, 2015 00:19 IST

तालुक्यातील ३८ गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्या गावांना हातपंपाने पाणीपुरवठा सुरू आहे. हातपंपाने होणारा पाणीपुरवठ्यात शुद्धीकरण्याची कुठलीही यंत्रणा नसल्याने येथील...

अचलपूर तालुक्यातील प्रकार : १४५ गावांना नळयोजनेतून पाणीपुरवठासुनील देशपांडे अचलपूरतालुक्यातील ३८ गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्या गावांना हातपंपाने पाणीपुरवठा सुरू आहे. हातपंपाने होणारा पाणीपुरवठ्यात शुद्धीकरण्याची कुठलीही यंत्रणा नसल्याने येथील नागरिकांना जलजन्य आजारांना सामोरे जावे लागत आहे. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यात एकूण १८४ गावे आहेत. त्यापैकी ४८ गावे उजाड आहेत. सध्या १३६ गावे आबाद आहेत. बहुतांश गावांत रस्ते, स्वच्छता, सांडपाण्याची समस्या आहे. पंचायत समितीअंतर्गत ७० ग्रामपंचायती येतात. गावातील पाण्याची समस्या अद्याप सुटलेली नाही. १४५ गावांना नळयोजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे. त्यातील ३५ गावांमध्ये विद्युत पुरवठ्यावर चालणाऱ्या नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. तालुक्यात पाणीसाठा विपुल असला तरी ग्रामीण भागात वारंवार होणारा खंडित विद्युत पुरवठा व लोकप्रतिनिधींचे ग्रामीण भागांकडे होणारे दुर्लक्ष, यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. ३८ गावांना बाराही महिने हातपंपाद्वारे पिण्याच्या पाण्याची तहान भागवावी लागत आहे. तालुक्यात जलशुद्धीकरण यंत्र नसल्याने क्षारयुक्त पाणी ग्रामस्थांना प्यावे लागते. उन्हाळ्यात तालुक्यात पाणीप्रश्न अधिक जटील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.उन्हाळयात भीषण पाणीटंचाईपाणीसाठा मुबलक असला तरी उन्हाळ्यात जमिनीतील पाण्याची पातळी खोल जात असल्याने काही गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण होते. काही वेळा हातपंपांना पाणी येणे बंद होते. खोल पाणी उपसले जात असल्याने हातपंपात बिघात होऊन ते बंद पडतात. परिणामी पाणीटंचाई निर्माण होते. याचा सर्वाधिक त्रास महिला वर्गाला सहन करावा लागतो. सौर ऊर्जेवरील हातपंपअचलपूर पंचायत समितीअंतर्गत जलालपूर व कुंभी उडाण या दोन गावांतील हातपंपामधील पाणी काढण्यासाठी सौर ऊर्जेवर चालणारी यंत्रणा बसविण्यात आली आहे. पावसाळ्यात सूर्यनारायणाने दर्शन देणे बंद केले की, समस्या निर्माण होते. तालुक्यात हातपंपांची संख्या ४२७ असून खानापूर, चांदुरा, जहागीर, औरंगापूर उडाण, जवळापूर, शेकापूर, वडुरा, जलालपूर, शंकरपूर, शहापूर यांसह ११ गावांत दुहेरी हातपंप आहेत. ११० गावांत कायमस्वरुपी पाणीपुरवठ्याची नळयोजना असल्याचा दावा पंचायत समितीतर्फे केला जात आहे.