शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठ्यात ३५ टक्के गळती

By admin | Updated: July 8, 2014 23:12 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत अंबानगरीला पाणीपुरवठा होतो. पाणीपुरवठा करताना ३५ टक्के पाण्याची गळती होत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. एकीकडे पाणी वाचविण्यासाठी ‘पाणी हेच जीवन आहे’,

हजारो लिटर पाण्याची नासाडी : जीवन प्राधिकरणाचे दुर्लक्षवैभव बाबरेकर - अमरावतीमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत अंबानगरीला पाणीपुरवठा होतो. पाणीपुरवठा करताना ३५ टक्के पाण्याची गळती होत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. एकीकडे पाणी वाचविण्यासाठी ‘पाणी हेच जीवन आहे’, असे घोषवाक्य जाहीर करताना पाणी वाचविण्यात खुद्द जीवन प्राधिकरणच अपयशी ठरल्याचे चित्र आहे. मोर्शीजवळील सिंभोरा धरणातून अमरावती शहराला पाणीपुरवठा केला जातो. सुमारे २३ किलोमिटरच्या पाईपलाईनद्वारे हा पाणीपुरवठा अमरावती शहरातील मार्डी मार्गावर जल शुध्दीकरण केंद्रापर्यंत केला जात आहे. त्या ठिकाणी पाणी शुध्दीकरणाची प्रक्रिया पुर्ण होऊन अमरावतीकरांना शुध्द पाण्याचा पुरवठा होत आहे. दररोज हजारो लिटर पाणी पाईप लाईनद्वारे ग्रॅव्हीटी पध्दतीने शहरवासियाच्या घरापर्यंत पोहचविले जात आहे. मात्र यातून ३५ टक्के गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पाईपलाईन लिकेज, सार्वजनिक नळ व पाणी चोरीचाही समावेश आहे. महापालिकेकडून सर्वाधिक पाण्याची नासाडीमहापालिकेच्या नावे जीवन प्राधिकरणाकडून नळजोडणी देण्यात आली आहे. त्यामध्ये महापालिकेतंर्गत येणारे कार्यालये, शाळा व सार्वजनिक नळाचा समावेश आहे. यासर्व ठिकाणी अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा सुरु आहे. याकरिता दरमहिन्याला २७.५ लाखांचे देयक महापालिकेकडे थकित आहे. आतापर्यंत थकित देयकांची रक्कम ६१ कोटींपर्यंत पोहोचली आहे. महापालिकेच्या नावे सुमारे १ हजाराच्यावर सार्वजनिक नळजोडणी आहे. त्यातील अनेक ठिकाणी नळाला तोट्या नाहीत. महापालिकेच्या नावे असलेल्या नळ कनेक्शनमधून सर्वाधिक पाण्याची नासाडी होत आहे.