शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेला ३० लाखांचा गंडा

By admin | Updated: August 17, 2014 22:52 IST

१३ व्या वित्त आयोगातून ३० लाख रुपयांची तरतूद करुन अतिआवश्यक सेवेसाठी वाहन खरेदी करण्याचे ठरविण्यात आले. मात्र ज्या एजंन्सीला वाहन पुरविण्याचा कंत्राट सोपविण्यात आला ती एजन्सी कागदोपत्रीच

एजन्सी पसार : सुरक्षित ठेव तोकडी, वाहनांचा पत्ता नाहीअमरावती : १३ व्या वित्त आयोगातून ३० लाख रुपयांची तरतूद करुन अतिआवश्यक सेवेसाठी वाहन खरेदी करण्याचे ठरविण्यात आले. मात्र ज्या एजंन्सीला वाहन पुरविण्याचा कंत्राट सोपविण्यात आला ती एजन्सी कागदोपत्रीच असल्याने महापालिकेला ३० लाखांचा गंडा लावण्यात आल्याचीे धक्कादायक बाब पुढे आली आहे. याप्रकाराने प्रशासन खडबडून जागे झाले आहे.१३ व्या वित्त आयोगातील अनुदान खर्च करण्यासाठी शासन नियमावली आहे. या नियमावलीच्या अधीन राहून अनुदान खर्च करावा लागतो. त्यानुसार महापालिका प्रशासनाने आरोग्य विभागातंर्गत पशुवैद्यकीय आणि आपतकालीन विभागासाठी आवश्यक सुविधांसाठी वाहन खरेदी करण्याकरिता निविदा प्रक्रिया राबविली. दोन प्रकाराची वाहने खरेदी करण्यासाठी एकत्रित निविदा प्रक्रिया राबवून अकोला येथील एका एजन्सीला वाहन पुरविण्याचा कंत्राट सोपविण्यात आला. मात्र हा कंत्राट सोपविताना संबंधित एजन्सीची सुरक्षित ठेव (बँक गँरटी) अतिशय तोकडी घेण्यात आली. या एजन्सींची कार्यप्रणाली किंवा पार्श्वभूमी न तपासता ३० लाखांचा धनादेश देण्याची किमया महापालिका प्रशासनाने केली आहे. अनेक दिवस लोटूनही या एजन्सीने वाहन पुरविले नाही. त्यानंतर या एजन्सीची शोधाशोध केली असता अकोला येथे या नावाची एजन्सी अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी आयुक्त डोंगरे यांनी निविदा प्रक्रियेत समाविष्ट अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मात्र या एजन्सीला वाहन पुरविण्याची जबाबदारी निश्चित करताना निकष ठरविण्यात कमालीची दिंरगाई झाल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले आहे. पशुवैद्यकीय विभाग आणि लेखाविभागाच्या अक्षम्य दुर्लक्षाने या एजन्सीला ३० लाखांचा धनादेश देण्यात आल्याचे निष्पन्न झाले. नियमावली डावलून केवळ टक्केवारीच्या मोहापायी अधिकाऱ्यांनी बनावट एजन्सीला ३० लाखांचा धनादेश सुपूर्द केल्याचे दिसून येते.