शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

दीपाली यांच्या शासकीय निवासस्थानी २३ मिनिटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 05:01 IST

आत्महत्या प्रकरणात अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक श्रीनिवास रेड्डी यांच्यावरसुद्धा गंभीर आरोप झाले.  त्यांच्या चौकशीसाठी प्रज्ञा सरवदे या २७ एप्रिल रोजी हरिसाल येथे पोहोचल्या.  त्यांनी दीपाली चव्हाण यांचे पती राजेश मोहिते  वनाधिकारी व कर्मचारी यांचे नोंदविलेले बयाण त्यावर प्रत्यक्ष बोलून पडताळणी केली. येथे तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पूनम पाटील, धारणीचे ठाणेदार विलास कुलकर्णी उपस्थित होते.

ठळक मुद्देप्रज्ञा सरवदे हरिसालला पोहोचल्या, बयाणाची पडताळणी

लोकमत न्यूज नेटवर्कहरिसाल (अमरावती) :  हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्याच्या अपर पोलीस महासंचालक  प्रज्ञा सरवदे यांनी हरिसाल येथे मंगळवारी प्रत्यक्ष भेट दिली.  दीपाली चव्हाण यांच्या  शासकीय निवासात वेगवेगळ्या खोल्यांमध्ये गेल्या. सरवदे यांनी तेथे २३ मिनिटे थांबून निरीक्षण नोंदविले.आत्महत्या प्रकरणात अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक श्रीनिवास रेड्डी यांच्यावरसुद्धा गंभीर आरोप झाले.  त्यांच्या चौकशीसाठी प्रज्ञा सरवदे या २७ एप्रिल रोजी हरिसाल येथे पोहोचल्या.  त्यांनी दीपाली चव्हाण यांचे पती राजेश मोहिते  वनाधिकारी व कर्मचारी यांचे नोंदविलेले बयाण त्यावर प्रत्यक्ष बोलून पडताळणी केली. येथे तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पूनम पाटील, धारणीचे ठाणेदार विलास कुलकर्णी उपस्थित होते. 

दीपालीची पर्स आणि २३ मिनिटे दीपाली चव्हाण हरिसाल येथे ज्या शासकीय निवासस्थानात राहत होत्या, त्या शासकीय निवासस्थानी  मंगळवारी सकाळी ११.३३ वाजता अपर पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांनी भेट दिली. दीपालीने जेथे स्वतःवर गोळी झाडली, तेथील बारीक-सारीक निरीक्षण नोंदविले. तेथे पडलेली दीपालीची पर्स उघडून पाहिली. काही कागदपत्रे होती, त्याचीही तपासणी केली.  उपस्थित कर्मचाऱ्यांकडून कुलूप उघडायला लावून त्या खोलीची  पाहणी केली. ११.५६ च्या सुमारास बाहेर पडल्या. 

कार्यालय जाणे टाळले, अधिकाऱ्यांना ‘नो एंट्री’एकसदस्यीय समितीच्या प्रमुख प्रज्ञा सरवदे यांच्या हरिसाल येथील भेटीदरम्यान पोलिसांसह व्याघ्र प्रकल्पाचा मोठा ताफा तैनात होता. गुगामलचे प्रभारी उपवनसंरक्षक अविनाश कुमार, मेळघाटच्या उपवनसंरक्षक पीयूषा जगताप, अकोटचे उपवनसंरक्षक नवाकिशोर रेड्डी, परीविक्षाधीन उपवनसंरक्षक बबन जोसफ हे आयएफएस अधिकारीसुद्धा तैनात होते. मात्र, आत कुणालाच एन्ट्री नव्हती. दीपाली जेथे कार्यरत होत्या, त्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात जाणे सरवदे यांनी  टाळले.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग