शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

२.१५ लाख ग्राहक लिंकिंगविनाच

By admin | Updated: January 20, 2015 22:29 IST

जिल्ह्यातील ४ लाख ५१ हजार ७७ ग्राहकांनी बँकेत कागदपत्रे जमा केली असून हे ग्राहक अनुदानासाठी पात्र झाले आहेत. मात्र उर्वरित २ लाख १५ हजार ९५ ग्राहकांनी अजून लिंकींग केले

अमरावती : जिल्ह्यातील ४ लाख ५१ हजार ७७ ग्राहकांनी बँकेत कागदपत्रे जमा केली असून हे ग्राहक अनुदानासाठी पात्र झाले आहेत. मात्र उर्वरित २ लाख १५ हजार ९५ ग्राहकांनी अजून लिंकींग केले नसल्याने त्यांना अनुदान मिळणार नाही. दरम्यान अनुदानासाठी गॅस वितरकांकडे बँक खाते क्रमांक जमा न केल्यास संबंधित ग्राहकांचा गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद करण्याचा फतवा काढण्यात आला आहे. गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारने गॅसचे अनुदान थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. अनुदानासाठी ग्राहकांनी बँकेत अर्ज व आधार कार्डचा नंबर द्यायचा असते. ज्यांच्याकडे आधार कार्ड नसेल त्यांनी बँक खाते क्रमांक दिला तरी अनुदान मिळते. त्यासाठी पासबुकची झेरॉक्स जमा करावी लागते. त्यानंतर अनुदान जमा होते. भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडेन कंपनीकडून गॅसचा पुरवठा केला जातो यासाठी शहरासह जिल्ह्यात गॅस एजन्सी कार्यरत आहेत. जिल्ह्यातील ३ लाख २९ हजार ३४२ ग्राहकांचे लिकींग झाले असून ५६८ रूपयांप्रमाणे त्यांचे अनुदान बँक खात्यात जमा झालेले आहे. उर्वरित २ लाख १५ हजार ७७ ग्राहकांनी अजून वितरकांकडे बँक खाते क्रमांक जमा केलेला नाही. त्यामुळे त्यांना अनुदान मिळणार नाही १ जानेवारीपासून ग्राहकांच्या बँक खात्यात अनुदान जमा होण्यास सुरूवात झाली आहे. २० जानेवारीपर्यंत २ लाख २९ हजार ३४२ ग्राहकांच्या खात्यात अनुदान जमा झाले आहे. ३१ मार्चपर्यंत लिंकिंग करणे आवश्यक आहे. तीन महिने असल्यामुळे ग्राहक लिंकिंगचे काम पुढे ढकलत आहेत. मात्र शेवटच्या महिन्यात एकाच वेळी ग्राहकांनी लिंकिंगसाठी एजन्सीकडे अर्ज केल्यास त्यांचा ताण कर्मचाऱ्यांवर येईल त्यामुळे अनेकांना अनुदानापासून वंचित रहावे लागेल. अनुदान योजनेंतर्गत प्रथम गॅस बुकींगला ५६७ रूपये खात्यावर जमा होतात नंतर टाकी ७६५ रूपयांना घेतल्यानंतर २९४ रूपये ८० पैसे खात्यावर जमा होतात. ५६७ व २९४ रूपये ८० पैसे मिळून ८६२ रूपये ८० पैसे बँक खात्यात जमा होतात. ग्राहकांना सिलिंडर केवळ ७६० रूपयांना मिळते. पहिली सिलिंडर घेताना ग्राहकांचा १०० रूपयांचा फायदा होतो. (प्रतिनिधी)